Tata Starbucks Coffee : कॉफीच्या चाहत्यांसाठी टाटा समूहाची भन्नाट योजना; दर 3 दिवसांत उघडणार 1 कॉफी स्टोअर

Tata Starbucks Coffee : तुम्ही कॉफी लव्हर आहात का? आपल्याकडे नेहमीच चहा आणि कॉफीच्या चाहत्यांमध्ये आमना-सामना झालेला पाहायला मिळतो. आजची ही बातमी मात्र पूर्णपणे कॉफीच्या चाहत्यांसाठी आहे. देशातील प्रसिद्ध टाटा समूह पूर्णपणे कॉफीच्या चाहत्यांच्या पक्षात असून लवकरच देशातील कॉफी लव्हर्सना समूहाकडून एक आनंदाची बातमी मिळणार आहे. टाटा कॉन्स्युमर लिमिटेड आणि स्टारबक्स यांच्या एकत्रीकरणाला भारतात Tata Starbucks असं म्हटलं जातं. आता हि कंपनी एका धमाकेदार योजनेच्या अंतर्गत दर ३ दिवसांमध्ये एक कॉफी स्टोअर उघडण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या मतानुसार या संपूर्ण योजनेचे लक्ष देशात 2028 पर्यंत 1000 कॉफी स्टोअर्स तयार करणे हेच असणार आहे. स्टारबक्सची कॉफी पिणं म्हणजे अनेक कॉफी प्रेमींचं स्वप्न असतं. आता टाटा समूह आणि स्टारबक्स म्हणजेच Tata Starbucks यांनी तयार केलेल्या या नवीन योजनेमुळे बाजारात लवकरच कॉफीच्या चाहत्यांना एक चांगली अशी बातमी मिळण्याची शक्यता आहे. भारतात स्टारबक्स आणि टाटा समूह यांचा एक जॉईंट वेंचर असल्यामुळे दोन्ही कंपन्यांचा यामध्ये समान वाट असतो. आता काय आहे टाटा आणि स्टारबक्सची अनोखी योजना जाणून घेऊया…

टाटा समूह दर तीन दिवसांत उघडणार एक नवीन स्टोअर: (Tata Starbucks Coffee)

स्टारबक्स आणि टाटा समूह यांनी एकत्र येऊन वर्ष 2028 पर्यंत देशात 1000 कॉफी स्टोअर उघडण्याची आखणी तयार केली आहे. या त्यांच्या अतरंगी योजनेमुळे देशात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. स्टारबक्सच्या कर्मचाऱ्यांची संख्या तर द्विगुणीत होऊन 8600 पर्यंत पोहोचेल अशी माहिती बाजाराला देण्यात आली आहे. सध्या स्टारबक्स ही कंपनी देशभरात आपल्या व्यवसायाचा विस्तार करीत आहे, आणि भारतातील कॉफी कल्चरला अधिकाधिक बढावा देण्यासाठी टाटा समूहची उपकंपनी म्हणजेच टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट आणि स्टारबक्स कार्यरत आहेत.

या योजनेअंतर्गत विविध भागातील स्थानिक व्यावसायिकांना रोजगार मिळावा म्हणून या दोन मोठाल्या कंपन्या काम करतील. देशातील कानाकोपऱ्यांत पसरलेल्या कॉफीच्या चाहत्यांना चांगल्यातल्या चांगल्या सेवा उपलब्ध करून देणे हाच कंपनीचा प्राथमिक उद्देश असेल अशी माहिती त्यांनी सादर केली आहे. आज जगभरात जरी स्टारबक्सची वाहवा होत असली, तरी त्यांना भारतात आपला व्यवसाय अधिकाधिक वृद्धिंगत करायचा आहे (Tata Starbucks Coffee). स्टारबक्स म्हटलं की आपल्या मनात एक महाग कॉफी शॉप असाच विचार येतो, आणि म्हणून अनेक ग्राहक इच्छा असूनही इथे प्रवेश करत नाहीत.

आता मात्र टाटा समूह आणि स्टारबक्स हे कॉफीचे स्टोअर छोट्या छोट्या शहरांमध्ये सुरू करतील ज्यामध्ये ड्राईव्ह थ्रू, एअरपोर्ट आणि 24 तास काम करणाऱ्या स्टोअर्स विस्तार केला जाईल. सध्या स्टारबक्स या कंपनीचा भारतातील 54 विविध शहरांमध्ये व्यवसाय सुरू आहे तसेच देशभरात कंपनीचे 390 पेक्षा जास्ती स्टोअर सुरु आहेत. आता मात्र टाटा समूह आणि कंपनीच्या या नवीन आणि भन्नाट कल्पनेमुळे त्यांचा व्यवसाय जोमाने वाढण्याची शक्यता आहे.