Tata Group चा ‘हा’ Share महिनाभरातच करून देईल बंपर कमाई

बिझनेसनामा ऑनलाईन । टाटा स्टीलच्या शेअरमध्ये मागील एका महिन्यापासून नव्याने तेजीत आलेली दिसून आली आहे. गेल्या एका आठवड्यात टाटा-ग्रुप फर्मसच्या शेअर्स मध्ये २ ते ५% वाढ झालेली असून आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्रोकरेज‌ फर्म रेलीगेयर ब्रोकिंगनुसार जून २०२३ पासून उंचावणारा मेटल इंडेक्स आणि सोबतच टाटा स्टीलची होणारी प्रगती ही एक सकारात्मक बाब आहे. टाटा स्टील फर्म ही टेक्निकल चार्टवर प्रगतीशील असून सदर बचतीची नोंद घेत असता रेलीगेयर ब्रोकिंगने टाटा स्टील सोबत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

एका महिन्यासाठी होल्डिंगच्या दृष्टीकोनातून १३० रुपये असे कंपनीचे लक्ष आहे. स्टॉपलॉस १०७ रुपये ठेवल्यास बाय रेंज ही ११४- ११५ अशी आहे. १० जुलै २०२३ रोजी शेअरची किंमत ११५.३० वर बंद झाली होती पण गेल्या पाच दिवसांत स्टॉक २ टक्क्यांपेक्षा अधिक वाढला असून गेल्या वर्षभरात टाटा स्टीलच्या स्टॉक मधील रिटर्न २६ टक्क्यांहून अधिक आहे व पाच वर्षांचा रिटर्न १०० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

रेलीगेयर ब्रोकिंगच्या म्हणण्यानुसार, जून २०२३ मध्ये मोठी सरासरी गाठल्यानंतर मेटल इंडेक्स हळूहळू उंचावत आहे. मेटल इंडेक्समध्ये झालेला ह्या बदलामुळे टाटा स्टील मध्ये सुधारणा पहायला मिळते.  २०२० मध्ये शेअर्सची नीचांकी पातळीपासून १४४ ची विक्रमी पातळी दिसून आली, त्यानंतर ८० ची पातळी गाठण्यात आली. १०, जुलै रोजी टाटा स्टीलचे एका दिवसातील शेअर्स  बीएसई (बोंबे स्टॉक एक्सेज) मध्ये ₹११५.७०वर पोहोचल्यानंतर ३.३६ टक्क्यांनी वाढून ₹११५.३५वर स्थिरावले. तसेच सदर पौलाद निर्मात्यांचे बाजारी भांडवल हे ₹१,४०,९५६.६४ कोटी रुपये असे आहे.

रेलीगेयर ब्रोकिंग लिमीटेड ही रेलीगेयर एन्टरप्रआईस लिमीटेडची उपकंपनी असून भारतातील एक अग्रगण्य वित्तीय सेवा समुह आहे. आरबीएल(RBL) ही शेअर बाजारातील सेक्युरिटी फर्म पैकी एक आहे आणि त्याचे एक दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत. ४०० पेक्षा अधिक शहरांमध्ये विस्तारित सदर कंपनी रेलीगेयर ब्रोकिंग इक्विटी, करन्सी, कमोडिटी आणि डेपोझिटरी पार्टीसिपंट संबंधित सेवा प्रदान करते.