Tata Technologies चा IPO लवकरच बाजारात येणार; पहा संपूर्ण माहिती

बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर मार्केट मध्ये गुंतवणूकदारांना सर्वात जास्त विश्वास हा टाटा ग्रुप या कंपनीवर आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कंपन्या आपला IPO बाजारात लाँच करत असताना आता 19 वर्षाच्या कालावधीनंतर टाटा ग्रुप आपली उपकंपनी टाटा टेक्नोलॉजीचा IPO बाजारात लॉन्च करणार आहे. या कंपनीला SEBI कडून ग्रीन सिग्नल देखील देण्यात आलेला असून टाटा टेक्नोलॉजीचा आयपीओ हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल असणार आहे. मार्चमध्ये या कंपनीने आयपीओ साठी कागदपत्रे जमा केली होती. या आयपीओ मध्ये प्रमोटर्स आणि शेअर होल्डर्स 9.5 करोड शेअरची विक्री करणार आहे.

टाटा समूहाचे एकूण बाजार भांडवल हे 11.7 लाख कोटी रुपये एवढे असून टाटा समूहाचे एकूण भांडवल हे 11.7 लाख कोटी रुपये एवढे आहे. टाटा टेक्नॉलॉजी च्या शेअर्स मध्ये टाटा मोटर्स ची 74.69 टक्के हिस्सेदारी आहे. त्याचबरोबर अल्फा टीसी होल्डिंग्स पीटीई या कंपनीचा 7.26%, कॅपिटल ग्रोथ फंड ची 3.63 टक्के एवढी हिस्सेदारी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये आहे. बोफा, सिक्युरिटीज आणि सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया हे टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओ इश्यू साठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

टाटा टेक्नॉलॉजी च्या IPO च्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये टाटा मोटर्स 81,113,706 लाख शेअर्स विकणार आहे. त्याचबरोबर टाटा टेक्नॉलॉजी, कॅपिटल ग्रोथ फंड हे दोन गुंतवणूकदार देखील शेअर विकणार असून शेअर बाजारातील गुंतवणूकदार टाटा टेक्नॉलॉजी च्या आयपीओची आतुरतेने वाट बघत आहे.

उत्तर अमेरिकेपासून युरोप पर्यंत टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीने त्यांचा बिजनेस वाढवला आहे. ही कंपनी ऑटो, एयरोस्पेस, इंडस्ट्रियल हेवी मशिनरी, आणि बाकीच्या इंडस्ट्रीजला सेवा पुरवते. ही कंपनी जगातील अनेक देशांमध्ये काम करते. या कंपनीमध्ये जगभरात 9300 कर्मचारी काम करतात. मागच्या वर्षी टाटा मोटर्स या कंपनीने टाटा टेक्नॉलॉजी मधील स्टेट विकण्यासाठी मंजुरी दिली होती.

टाटा ग्रुपने यापूर्वी 2004 मध्ये TCS नंतर टाटाच्या कोणत्याही कंपनीने शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला नव्हता. त्यानंतर आता 19 वर्षानंतर ते शेअर मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ लॉन्च करणार आहे. टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांच्या कार्यकाळातील हा पहिला आयपीओ असणार आहे.