Tata Motors विकणार टेक्नॉलॉजी मधील 9.9% हिस्सा; कमावणार 16,300 कोटी

Tata Motors : समोर आलेल्या बातमीनुसार काही दिवसांमध्ये टाटा मोटर्स हि कंपनी टाटा टेकनोलोजीस (Tata Technologies) मधला काही हिस्सा विकणार आहे. शेअर मार्केटचं म्हणण आहे की टाटा मोटर्स TPG Rise Climate या कंपनीला आपला 9.9% हिस्सा विकणार आहे. देशातील अनेक नावजलेल्या आणि उल्लेखनीय कंपन्यांमध्ये टाटाचा उल्लेख केला जातो. मात्र आता हि कंपनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आपले शेअर्स विकण्याच्या तयारीत आहे हे जर का जाणून घ्यायचे असेल तर शेवटपर्यंत नक्की वाचा…

टाटा मोटर्स विकणार काही हिस्सा : Tata Motors

शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स हि कंपनी टाटा टेक्नोलोजीसमधून येत्या काही दिवसांत 9.9 टक्के हिस्सा TPG Rise Climate या कंपनीला विकणार आहे. दोन्ही कंपनीमध्ये करार झाल्यानंतर टाटा मोटर्स या कंपनीच्या मुल्यांकनामध्ये वाढ होणार आहे. या व्यवहारानंतर टाटा मोटर्स मुल्यांकन 2 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 16,300 कोटी होईल. कंपनीचा हा हिस्सा विकल्यानंतर टाटा मोटर्सला 1614 रुपयांचा फायदा होणार आहे, झालेल्या कराराप्रमाणे कंपनीकडून 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत हा हिस्सा विकला जाईल.

Tata Technologies लवकरच करणार IPO लाँच :

टाटा टेकनॉलोजिस हि टाटा मोटर्सची (Tata Motors)उपकंपनी आहे, आणि काही दिवसांतच हि कंपनी आपला IPO प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहे. शेअर बाजाराकडून IPO लोन्च करण्याची त्यांना परवानगी देखील मिळाली आहे. इथे टाटा टेकनॉलोजिसचे सर्व शेअर्स Offer for Sale च्या अंतर्गत विकले जातील. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात टाटा मोटर्सचे शेअर्समध्ये 5.30 टक्क्यांची वाढ झाली व ते 667 रुपयांवर बंद झाले, आणि व्यवहारावेळी त्यांनी 669चा उच्चांक गाठला होता.