Tax Saving Schemes: भारत सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात ज्यांच्या मदतीने तुम्ही पैश्यांची योग्य गुंतवणूक करू शकता पण सोबतच लागू होणाऱ्या करापासूनही दूर राहता येतं. अनेकवेळा सरकारी कर चुकवण्यासाठी कित्येक लोकं चुकीच्या गोष्टींचा अवलंब करतात, मात्र त्यात अडकण्याची किंवा पकडले जाण्यची जोखीम असते. तुम्ही जर का सरकारला कर देत असाल आणि यापासून दूर राहण्याची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्ही काही अश्या सरकारी योजना सुचवणार आहोत ज्यांमुळे हे सहज शक्य आहे.
करापासून वाचण्यासाठी या सरकारी योजना: (Tax Saving Schemes)
आपण ज्या जागेत राहतो त्यासाठी कर भरणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणूनच भारत सरकारला अमुक एका रकमेपेक्षा अधिक पैसे कमावणारा नागरिक कराची रक्कम देत असतो. अनेक मंडळी या करापासून सावध राहण्यासाठी काही युक्त्य लढवतात, पण त्यात कधी न कधीतरी पकडले जाण्याची जोखीम असतेच त्यामुळे अश्या गोष्टींपासून दूर राहा आणि जाणून घ्या अश्या काही सरकारी योजना ज्यांमुळे काराचा भार हलका होईल. छोट्यातली छोटी गुंतवणूक तुम्हाला करापासून वाचवू शकते हे माहिती आहे का? हो!! पोस्ट ऑफिस योजनांमध्ये तुम्ही कमी किंवा दीर्घ काळासाठी गुंतवणूक करू शकता. या योजनांमध्ये पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी योजना, जेष्ठ नागरिक बचत योजना ( Senior Citizen Saving Scheme), Term Deposite इत्यादी योजनांचा समावेश होतो.
या योजना फायदेशीर का?
आयकर कलम 80च्या तरतुदीनुसार तुम्ही पब्लिक प्रोविडेंट फंड(PPF)मध्ये 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत वार्षिक गुंतवणूकीची मर्यादा 1.5 लाख असल्यामुळे इथे कोणताही कर आकारला जात नाही. छोटी गुंतवणूक करण्यासाठी हि योजना लाभदायक आहे, यावर 7.1 टक्क्याचा व्याज दिला जातो आणि जास्तीत जास्त 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते.
पब्लिक प्रोविडेंट फंड प्रमाणेच सुकन्या समृद्धी योजना तुम्हाला करापासून वाचवू शकते (Tax Saving Schemes). हि योजना देशातील मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित बनव्यासाठी राबवण्यात येते. यावर 8 टक्क्यांचा व्याज दिला जातो आणि वयाच्या 18 व 21व्या वर्षी बचत केलेली रक्कम मुलीच्या खात्यात जमा होते.
देशातील कर्मचारी PF खात्याचा वापर करून सुरक्षित गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात. या योजनेत पुन्हा एकदा आयकर कलम 80च्या अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत करावर सूट दिली जाते तसेच या योजनेत मिळणारा व्याजदर हा 8.1 टक्के आहे. योजनेचा प्रमुख उदेश निवृतीसाठी पैसे जमा करणे असं असला तरीही तुम्ही गरजेनुसार पैसे काढू शकता. वर सुचवलेल्या योजनांचा नक्कीच आढावा घ्या आणि करापासून सावध राहण्यासाठी चुकीच्या पद्धती निवडणे टाळा.