Tax Season 2024: वर्षभरात याच काळात, कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीची पुरावा देण्यासाठी सांगतात. तुम्ही नेमके किती पैसे कमावता हे जाणून घेण्यासाठी काही पुरावे खूप महत्वाचे असतात, त्यावरच तुमचा कर किती भरायचा हे ठरतं. म्हणूनच, वेतनधारकांना ही कागदपत्र व्यवस्थित आणि पूर्ण करून ठेवायची खूप गरज असते. त्यामुळे यंदाचं आर्थिक वर्ष संपण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी लक्ष्यात ठेऊन पाऊलं उचला..
कर बचतीची गरज ओळखा: (Tax Season 2024)
तुमच्या कर बचतीची गरज जाणून घेणे हे खूप महत्वाचे आहे, यामुळे तुमच्या वार्षिक उत्पन्नानुसार कर बचत कशी करायची ते ठरवायला मदत होते. जर तुम्ही नोकरदार असाल किंवा स्वतंत्र व्यवसाय करत असाल तर तुम्ही दरवर्षी जुन्या आणि नवीन कर वसुली पद्धतीमध्ये बदल करू शकता. पण, जे सेवानिवृत्त, विद्यार्थी किंवा इतर गटात येतात त्यांना या पद्धतीमध्ये आयुष्यभरत फक्त एकदाच बदल करण्याची परवानगी आहे.
कलम 80C अंतर्गत तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळवू शकता. पण यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करावा हे जाणून घेणं महत्वाचं आहे. तुमची उत्पन्न वाढण्याची शक्यता असल्यास वर्षाच्या शेवटी कर बचत करण्यासाठी FD, ELSS, पोस्ट ऑफिस योजनांसारख्या कर बचत करणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करा त्यामुळे तुमचा कर कमी होईल आणि पैसा वाचेल.
शेअर बाजारात गुंतवणूक करताय का?
शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर मग “Tax Loss Harvesting” ही गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कधी कधी काही शेअर्स नुकसानीत जातात, पण या नुकसानीचा फायदाही घेता येतो, यालाच Tax Loss Harvesting म्हणतात.
दरवर्षी आर्थिक वर्ष संपायच्या आधी(Tax Season 2024), 1 लाख रुपयांपर्यंत दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) असलेले शेअर्स विकून टाका आणि पुन्हा त्याच कंपनीत गुंतवणूक करा, यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीवर लागणाऱ्या LTCG करात मोठी बचत होऊ शकते. थोडासा वेळ शेअर बाजारातून बाहेर पडून पुन्हा गुंतवणूक करणे, हेच तर “Tax Loss Harvesting” चं रहस्य आहे.