TCS Ex Dividend :आज होणार TCS चा एक्स-डिवीडेंट ट्रेड; कोणते गुंतवणूकदार होणार मालामाल?

TCS Ex Dividend :आज टाटा समूहाची एक कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस(Tata Consultancy Services) Ex-Dividend चा व्यापार करणार आहे. कंपनीच्या निर्णयानुसार ती 1 रुपयाचे दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 9 रुपये अंतरिम लाभांश आणि 18 रुपयांचा विशेष लाभांश मंजूर करणार आहे, डिसेंबर महिन्यात कंपनीच्या तिमाहीचे निकाल जाहीर करत असतानाच त्यांनी ही घोषणा केली होती. म्हणूनच आता कंपनीकडून एकूण 27 रुपयांचा लाभांश मंजूर करण्यात आला आहे, आणि या लाभांशाची विक्री आज म्हणजेच 19 जानेवारी रोजी केली जाणार आहे.

टाटा कोणाला देणार लाभांश? (TCS Ex Dividend)

टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसने दिलेल्या माहिती नुसार कंपनी केवळ सदस्यांच्या नोंदणीमध्ये असलेल्या किंवा ठेवीदारांच्या नोंदीमध्ये असलेल्या भागधारकांनाच लाभांशाचा भाग देणार आहे. या लाभार्थी वर्गाच्या खात्यात विशेष लाभांशाची रक्कम 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत जमा करण्यात येणार आहे(TCS Ex Dividend). या चालू आर्थिक वर्षात कंपनीचा ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यातील निव्वळ नफा 8.2 टक्क्यांनी वाढून 11735 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचाल आहे. परकीय चलनाच्या वाढलेल्या कमाईमुळेच एकूण नफ्यात वाढ झाल्याचं म्हटलं जातंय. भारताची बाजारपेठ आजही एक उदयोन्मुख बाजारपेठ म्हणून ओळखली जाते, जिथे आपण अनेक बदल घडवत आपली परिस्थिती सुधारण्याच्या तयारीत असतो. याच प्रयत्नाअंती हि बाजारी स्थिती दुहेरी अंकाने वाढली असल्याने कंपनीचा एकूण महसूल वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 4 टक्क्यांनी वाढून 60,583 कोटी रुपये झाला आहे.

आज सकाळी BSE वर कंपनीच्या शेअर्सची सुरुवात तेजीत झाली. कंपनी 1 टक्क्याच्या मजबुतीसह 3938 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे, आणि गेल्या वर्षभरात कंपनीने जवळपास 16 टक्क्यांचा परतावा देऊ केला आहे . Infosysच्या एक पाऊल पुढे असलेली हि कंपनी आपल्या देशातील सर्वात मोठी IT कंपनी आहे, व तिचे एकूण मार्केट कॅप 14,41,794 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलंय.