TCS Hiring : देशातील सर्वात मोठी IT कंपनी म्हणजेच टाटा कन्सलटन्सी यांच्याकडून युवकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जगात मंदीचे दिवस सुरु असताना सुद्धा टाटा कडून आलेली हि बातमी सुखकारक म्हणवली लागेल. या मंदीच्या वातावरणात अनेकांनी हातातल्या नोकऱ्या गमावल्या आहेत, आणि अनेकांवर यापुढे नोकऱ्या गमावण्याची भीती कायम आहे. तसेच अलीकडेच अनेक IT कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढलेलं असताना टाटा कंपनीकडून नवीन भरती सुरु झाली आहे..
टाटाने सुरु केली नोकरदारांची भरती (TCS Hiring):
हल्लीच टाटा कंपनीकडून (TCS) 40,000 नवीन नोकऱ्यांची भरती सुरु केली आहे. कंपनीचे CEO एन गणपती सुब्रामाण्याम यांनी संदर्भात माहिती देताना सांगितलं कि कंपनी यंदा नवीन नोकरदारांच्या शोधात आहे व कंपनी 35,000 ते 40,000 नवीन लोकांना संधी देऊ पाहत आहे. गेल्यावर्षी देखील टाटा कंपनीने 50,000 नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. जगभरातून कंपन्या आपल्या कर्मचारी वर्गाला हटवत असताना टाटाने दिलेली हि माहिती अनेकांना सुखावणारी आहे.
टाटाच्या शेअर्समध्ये घसरण:
दरम्यान, सोमवारच्या शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. कामकाजाच्या वेळी टाटाचे शेअर्स 3541 रुपयांवर व्यवहार करत होते. कंपनीचा Contract Volume जरी स्थिर वाटत नसला तरीही त्यांची महसूल वाढ उत्तम आहे. TCS चा ब्रिटनमधील व्यवसाय देखील जोमाने सुरु आहे. मागच्या दोन तीन वर्षात कंपनीने जवळपास 2लाख तरुणांना नोकरी दिली होती, मात्र काही कर्मचारी अजूनही कार्यालयात आलेले नाहीत असे CEO सुब्रामाण्याम यांचे म्हणणे आहे.