TCS Job Scam : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी म्हणजेच TCS मध्ये नोकरी मिळवण्यासाठी लाचखोरी केल्याची बातमी समोर आली आहे. या गुन्ह्यामुळे कंपनीकडून 16 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. तसेच कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या सहा वेंडार्सना ब्लेक लिस्ट (Black List) करण्यात आलं आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात आली होती, आज आपण जाणून घेऊया काय आहे हे नेमकं प्रकरण…
TCS कंपनीमध्ये झाली लाचचोरी (TCS Job Scam):
देशातील सर्वात मोठी IT कंपनी म्हणजे TCS मध्ये लाचखोरीचे प्रकरण (TCS Job Scam) समोर आलं आहे. यामध्ये गुंतलेल्या 16 कर्मचार्यांना आणि कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या 6 वेंडर्सना ब्लेक लिस्ट केले आहे. या कर्मचारी पुरवणाऱ्या कंपन्या, त्यांचे मालक आणि सहयोगी कंपन्या यापुढे TCS सोबत कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. शेअर बाजाराला मिळालेल्या माहितीनुसार बंदी घातलेल्या सहा कंपन्या TCS च्या वेंडर्स होत्या व कंपनीला कंत्राटी कर्मचारी पुरवण्याचे काम करत होत्या. या प्रकरणात 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आणि 16 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं, तर राहिलेल्या तीन कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या कामावरून हटवण्यात आलं आहे.
असे होते आरोप :
समोर आलेली बातमी सांगते कि व्हिसलब्लोव्हरने TCS ला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय कि कंपनीच्या रीसोर्स मेनेजमेंट ग्रुपचे ग्लोबल चीफ चक्रवर्ती हे गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी नियुक्त करणाऱ्या कंपन्यांकडून लाच घेत आहेत, झालेल्या आरोपांचा तपास TCS चे अधिकारी अजित मेनन यांच्या देखरेखीखाली करण्यात आला व चक्रवर्ती यांना सुट्टीवर पाठवण्यात आलं होतं.