TCS Shares: टाटा समूहातील IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने बाजारात आज एक अविश्वसनीय कामगिरी करत इतिहास रचला आहे. कंपनीचा शेअर आजच्या बाजारी कार्यकाळात उच्चांकावर पोहोचला आणि केवळ 35 मिनिटांत जवळपास 60 हजार कोटींची कमाई करून दाखवली, यामुळे TCS चे मार्केट कॅप 15 लाख कोटींपेक्षाही पुढे गेले, जे भारतातील शेअर बाजाराला प्रेरणा देणारे होते.
आज टाटा कंपनीने केलाय विक्रमी पराक्रम: (TCS Shares)
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), भारतातील सर्वात मोठी IT कंपनी आहे आणि या कंपनीने आज म्हणजेच मंगळवारी, 6 फेब्रुवारी 2024 रोजी शेअर बाजारात विक्रमी उच्चांक गाठून दाखवला. BSEच्या आकडेवारीनुसार, सकाळी 9:50 वाजता 35 मिनिटांच्या ट्रेडिंगमध्ये TCS चा शेअर 4.10 टक्क्यांनी वाढून 4135.90 पर्यंत पोहोचला.
या वाढीसह, TCS ने आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याने कंपनीचे मार्केट कॅप 5.13 लाख कोटींपेक्षाही अधिक झाले आहे. जुन्या आकड्यांवर नजर फिरवली तर काल 5 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीचे मार्केट कॅप 14,53,649.63 कोटी होते. याचाच अर्थ केवळ 35 मिनिटांत TCS ने 60 हजार कोटींची कमाई केली आहे आणि सध्या कंपनीचे मार्केट कॅप 15,09,322.10 कोटी बनले आहे.
कंपनीचे मार्केट कॅप 15 लाख कोटींच्या पलीकडे:
आज 6 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीने शेअर बाजारात हा नवीन इतिहासात नोंदवला. कंपनीचे मार्केट कॅप पहिल्यांदाच 15 लाख कोटी रुपयांच्या पलीकडे गेले, मात्र हा टप्पा पार करणारी ही देशातील दुसरी मोठी कंपनी ठरली आहे. कारण यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजने हा कारनामा करुन दाखवला होता. हे यश टाटा समूहासाठी आणि भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आजचे त्यांचे हे कार्य दर्शवते की भारतीय कंपन्या जागतिक पातळीवर स्पर्धात्मक आहेत आणि त्यांचा भविष्यात मोठा विकास होण्याची शक्यता आहे.