बिझनेसनामा ऑनलाईन । भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS) यांनी वित्तीय वर्ष २०२३-२४ चा पहीला निकाल जाहीर केला. जाहीर झालेल्या निकालात कंपनीने अनेक उच्चांक गाठले आहेत. बुधवार दिनांक १२ जुलै रोजी तीन महिन्यांचा म्हणजेच एप्रिल ते जून चा आर्थिक निकाल हा ब्रोकरेज फर्म रेलिगेअर रिटेलर रिसर्चच्या अनुमानाशी जुळणारा असून ब्रोकरेजने टीसीएसला बायची रेटिंग दिली. यासाठी ३,८८२ रुपयांचे टारगेट प्राईज निश्चित करण्यात आला आहे. निश्चित केलेला भाव हा टीसीएसच्या विद्यमान बाजारी भावापेक्षा १६.२ टक्क्यांनी अधिक आहे. टीसीएसचे शेअर्स गुरुवार दिनांक १३ जुलै रोजी एनएसईवर २.६० टक्क्यांनी वाढून ३,३४४.५० भावावर थांबले.
रॅलीगेअर रिटेल रिसर्चच्या म्हणण्यानुसार टीसीएसचा जून महिन्यातील निकाल हा नेमका त्यांच्या अनुमानाप्रमाणे लागला आहे. रुपयांच्या गणनेत कंपनीच्या तिमाही महसूलची वाढ ०.४ टक्के आणि वार्षिक आधारावर १२.६ टक्के अशी असून ५९,३८१ करोड रुपये झाली आहे. तसेच डॉलर्सच्या किंमतीत कंपनीचा रेव्हेन्यू हा तिमाही ०.४ टक्के आणि वार्षिक आधारावर ६.६ टक्के वाढून ७२२.६ करोड डॉलर झाला आहे. कॉन्स्टंट करन्सी मध्ये तिमाही वाढ ही सपाट असून वार्षिक दृष्ट्या ७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.
भौगोलिक दृष्ट्या नजर फिरवल्यास कंपनीची सर्वात जास्त वाढ १६.१ टक्के असून ती युके मध्ये पाहायला मिळते. भारताची टक्केवारी १४ असून, लॅटिन अमेरिकेचा आकडा १३.५ टक्के आहे. तसेच गल्फ देशांचा आकडा १५.२ टक्क्यांचा पहायला मिळतो. कंपनी कार्यरत असलेल्या इतर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्यास १०.१ टक्क्यांची वाढ ही जीवन विज्ञान आणि आरोग्य सेवा क्षेत्रात पाहायला मिळते. उत्पादन क्षेत्रात ९.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त BFSI, रिटेल अँड कंज्यूमर तंत्रज्ञान आणि मीडिया विभागात ३%, ५.३%, ४.४% आणि ०.५% अशी क्रमशः वाढ नोंदविण्यात आली.
कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ :
टीसीएसचे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड म्हणाले, वार्षिक नुकसान भरपाई च्या पुनरावलोकनात विशेष कामगिरी दर्शवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात १२ ते १५ टक्के वाढ केली आहे, तसेच त्यांच्या प्रमोशनवर देखील भर देण्यात येत आहे. कंपनीतील कर्मचारी वर्गाची नोकरी सोडण्याच्या पातळीत सातत्याने घट होत आहे. आकडेवारी पाहता तीन महिन्या अगोदरचा आकडा २०.१% असून आता १७.८% झाला आहे.