TCS vs TDS :ITR भरताना लागणारे हे सर्वात महत्वाचे घटक कोणते? TCS आणि TDS मधला एकूण फरक तर काय?

TCS vs TDS : देशातील प्रत्येक कमावत्या माणसाला सरकारला एका ठराविक रक्कम आयकर म्हणून भारावीच लागते. तुम्ही जर का काही चुकीची कारणं देत हा कर चुकवण्याचा प्रयत्न करीत असाल तर मुळीच अशी चूक करू नये, कारण एखादवेळेस हे सरकारच्या नजरेत आल्यास तुमच्या विरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. आयकर विभागाला तुम्ही ITR ची मागणी करताना देखील पाहिलंच असेल, ITR म्हणजे Income Tax Return या दस्ताऐवजच्या माध्यमातून तुम्ही सरकारला तुमच्या पगारबद्दल आणि भरलेल्या काराबद्दल माहिती देत असता. मात्र कधी TDS आणि TCS बद्दल ऐकलंय का? नक्कीच ऐकलं असेल!! आणि अनेकवेळा यांमध्ये तुमचा कदाचित गोंधळही उडालेला असू शकते. आता काही चिंता करू नका, कारण आज आम्ही तुम्हाला या दोन्ही घटकांबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत..

ITR भरण्यासाठी लागणाऱ्या या दोन्ही घटकांमध्ये फरक काय? (TCS vs TDS)

TDS आणि TCS या दोन्ही कर वसुलीच्या पद्धती आहेत. TDS म्हणजे Tax Deduction at Source तर TCS म्हणजे Tax Collection at Source होय. इथे तुमच्या पगारमधली ठराविक रक्कम कापून सरकारच्या खात्यात जमा केली जाते, मात्र दोन्ही प्रकारांमध्ये विशेष फरक आहे. तो काय हे जाणून घेऊया..

एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून कर वाजा करून दिल्या जाणाऱ्या उरलेल्या रकमेला TDS असं म्हणतात. विविध प्रकारच्या उत्पन्न स्रोतांवरून ही रक्कम वजा करण्यात येते. यामध्ये पगार, व्याज आणि गुंतवणुकीवर मिळणारे कमिशन इत्यादींचा समावेश होतो. सरकारकडून प्रत्येक आर्थिक वर्षपूर्वी कोणत्या रकमेवर किती प्रमाणात TDS कापला जाईल याची घोषणा करते, आणि त्यानुसार कर कपात करणार्‍या व्यक्तीला Deductor आणि ज्या व्यक्तीकडून TDS कापला जातो त्याला Deductee असं म्हणतात.

समजा, तुम्हाला एक लॉटरी लागली, तर त्यावर सरकारला तुम्हाला काही टक्के रक्कम कर म्हणून द्यावी लागेल. TDSची रक्कम 10 किंवा 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित केलेली असते. तुमच्या 10 लाख रुपयांच्या लॉटरीवर जर का 10 टक्क्यांचा TDS लागला तर केवळ 7 हजार रक्कम तुमच्यात हातात उरेल(TCS vs TDS).

दसऱ्या बाजूला TCS म्हणजे स्त्रोतावर जमा केलेला कर. हा कर अनेक प्रकारच्या वस्तूंच्या व्यवहारावर लावला जातो. आणि अश्या वस्तूंची खरेदी करत असताना तुमच्याकडून कराची रक्कम वसूल केली जाते. खरेदीदाराकडून TCS गोळा करून तो सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी मालाची विक्री करणाऱ्या व्यक्तीची असते, म्हणूनच त्याला TCS असं म्हटलं जातं. आयकर कायद्याच्या कलम 206C (1) नुसार, व्यावसायिक कारणांसाठी काही वस्तूंच्या विक्रीवरच TCS कापण्याचा नियम आहे, मात्र हा कर वैयक्तिक वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंवर लागू होत नाही.

उदारणार्थ जर का एका व्यक्तीने एखाद्या कंपनीला भंगार विकले तर त्यावर नियमांनुसार 1 टक्क्यांचा TCS आकारला जाईल. म्हणजेच 1000 रुपये तुम्हाला सरकार जमा करावे लागतील. मात्र लक्ष्यात असुद्या की इथे नेहमीच वस्तूंच्या अनुसार लागणाऱ्या करांच्या किमती बदलत असतात.