Term Life Insurance: तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करण्याचा सोपा आणि स्वस्त मार्ग

Term Life Insurance: तुम्ही तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करण्याचा विचार करत असाल तर टर्म लाइफ इन्शुरन्स हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. इतर जीवन विमा योजनांच्या तुलनेत टर्म इन्शुरन्स समजून घेणं आणि खरेदी करणं सोपं आहे. यात तुम्हाला कमी प्रीमियममध्ये जास्त कव्हरेज मिळतं आणि तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त गुंतवणुकीची गरज नसते.

Term Life Insurance काय आहे?

टर्म लाइफ इन्शुरन्स हा एक करार आहे ज्यामध्ये तुम्ही एका निश्चित कालावधीसाठी (Term) विमा कंपनीला प्रीमियम भरायचा असतो. जर या कालावधीत तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या नॉमिनीला(Nominee) विमा कंपनीकडून रक्कम दिली जाते.

पॉलिसी निवडताना, काही महत्त्वाचे घटक लक्षात ठेवा:

1. मूळ कव्हरेज: तुमच्या कुटुंबाला किती पैशांची गरज आहे याचा अंदाज लावा आणि त्यानुसार रक्कम निवडा. ही रक्कम ठरवताना तुम्ही तुमच्या उत्पन्न, कर्ज आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्यांचा विचार करू शकता.

2. पॉलिसीची मुदत: तुम्हाला किती वर्षांसाठी कव्हरेज हवं आहे याचा विचार करा. तुमच्या मुलांचं वय आणि तुम्ही निवृत्त होण्याची योजना यावर ते अवलंबून असल्याने या घटकांना डोळ्यासमोर ठेऊन पॉलिसी निवडा.

3. प्रीमियम: तुम्ही किती प्रीमियम भरण्यास तयार आहात याचा विचार करा. प्रीमियम तुमच्या वयावर, आरोग्यावर आणि तुम्ही निवडलेल्या कव्हरेजवर अवलंबून असतात(Term Life Insurance०.

4. राइडर्स: तुम्ही तुमच्या मूलभूत कव्हरेजमध्ये रायडर लाभ जोडू शकता. हे अतिरिक्त कव्हरेज प्रदान करतात जसे की अपघाती मृत्यू लाभ, गंभीर आजार लाभ आणि अपंगत्व लाभ, ,मात्र रायडर लाभासाठी तुम्हाला अतिरिक्त प्रीमियम भरावा लागतो

5. टॅक्स लाभ: टर्म लाइफ इन्शुरन्सवर मिळणाऱ्या टॅक्स लाभांचा विचार करा.