Tesla In India : Tesla भारतात सुरु करणार व्यवसाय; आता स्वस्तात मिळणार इलेक्ट्रिक गाड्या

Tesla In India । काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी पाहिली होती ज्यात जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणजेच Elon Musk मस्क यांची कंपनी टेस्ला भारतात आपला व्यवसाय (Tesla In India) सुरू करणार आहे अशी माहिती समोर आली होती. मात्र चीन सारख्या शेजारी देशात इलेक्ट्रिक गाड्या बनवून त्यांचा खप करण्यासाठी भारतीय बाजाराचा वापर करायचा नाही असा आदेश Elon Musk यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता. नरेंद्र मोदी आणि एलोन मस्क यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आता जगातली ही सर्वात मोठी इलेक्ट्रिक गाड्या तयार करणारी कंपनी भारतात आपला व्यवसाय घेऊन येण्यासाठी सज्ज झाली आहे भारत सरकार आणि टेस्ला कंपनी यांच्यात करार झालेला असून पुढच्या वर्षापासून म्हणजेच 2024 पासून टेस्ला कंपनी आपल्या गाड्यांची विक्री भारतीय बाजारात करणार आहे…

Tesla उभारणार भारतात प्लांट : Tesla In India

एलोन मस्क आणि भारत सरकार यांच्यामध्ये झालेला करार शेवटच्या टप्प्यावर असल्यामुळे पुढील वर्षात टेस्ला ही कंपनी भारतीय बाजारात आपल्या गाड्यांची विक्री करण्यासाठी तयार आहे. याबरोबरच समोर आलेली आणखी एक माहिती असं सांगते की पुढील दोन वर्षात टेस्ला भारतात आपलं एक प्लांट देखील उभारू शकते आणि यासाठीच ते गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांचा विचार करत आहेत.

टेस्टला या कंपनीकडून विकली जाणारी इलेक्ट्रिक गाडी ही साधारणपणे 20,000 डॉलर्सच्या जवळपास म्हणजेच 16.50 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. काही तज्ञांच्या मते ही किंमत 10 लाख रुपये सुद्धा असू शकते. अनेक कार प्रेमींसाठी ही बातमी खरोखरच आनंदाची म्हणावी लागेल कारण या कंपनीने जगभरात आपले नाव निर्माण केल्यामुळे प्रत्येक कार प्रेमीचं‌ आपल्याजवळ टेस्ला कंपनीची गाडी असावी असं स्वप्न नक्कीच असेल. मस्क पुढील वर्षातच आपली कंपनी घेऊन भारतात येणार असल्यामुळे भारतीय बाजारात एक नवीनच उत्साह संचारला आहे. भारतीय बाजारात एलोन मस्क यांचा बॅटरीच्या निर्मितीचा प्रयत्न करण्याचा देखील विचार असू शकतो अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत.

प्राथमिक टप्प्यावर असताना टेस्ला कंपनी या प्लांटसाठी (Tesla In India) एकूण 2 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी दाखवत आहे. त्यांची ही गुंतवणूक येणाऱ्या काळात जर का यशस्वी ठरली तर पुढे जाऊन 15 बिलियन डॉलर्स पर्यंत पैसे खर्च करण्याची देखील टेस्ला कंपनीची तयारी आहे. याबद्दल कोणतीही विशेष माहिती समोर आलेली नाही तरीही कंपनीचे मालक एलोन मस्क हे खूप आधीपासूनच भारतीय बाजारात आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्सुक होते.