Tesla India : मागच्या अनेक दिवसांपासून जगभरातील सर्वात श्रीमंत माणूस आपल्या भारत देशात व्यवसाय सुरु करण्याची स्वप्न पाहतोय. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क आहेत. कित्ती तरी दिवसांपासून एलोन मस्क हे सर्वतोपरी प्रयत्न करत भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचा व्यवसाय सुरु करू पाहत आहेत पण या ना त्या कारणाने हे उद्दिष्ट साध्य होत नाही. भारत सरकारजवळ मस्क यांनी विशेष सवलतींची मागणी केली होती, मात्र सरकारने ती मागणी केव्हाच फेटाळून लावली आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार पहिल्या टप्प्यात असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील एलोन मस्क यांना जबरदस्त सुनावले होते आणि आता एलोन मस्क यांना स्वप्नपूर्ती पासून मागे खेचण्यात आणखीन एक नाव जोडलं गेलंय ते म्हणजेच रतन टाटा. रतन टाटा का बनलेत मस्कसाठी अडथळा जाणून घेऊया…
टाटा बनलेत Elon Musk चा नवीन अडथळा:
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांचा व्यवसाय सुरु करू पाहत असलेल्या एलोन मस्क यांच्या अडचणी काही संपत नाहीत आणि आता रतन टाटा हे त्यांच्यासाठी नव्याने बनलेला अडथळा ठरले आहेत. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांवर 100% इम्पोर्ट टॅक्स कमी न करण्याचा मुद्दा हातात घेऊन सरकारवर दबाव टाकत आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार देशांतर्गत चालणारे उद्योग आणि त्यांचे गुंतवणूकदार यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारी अधिकाऱ्यांवर हा दबाव टाकला जात आहे.
नेमक काय आहे प्रकरण? Tesla India
सध्या भारत सरकार एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या (Tesla India) भारतीय बाजारपेठेतील प्रवेशाबद्दल योजनांचा आढावा घेत आहे. कंपनीला सरकारकडून कारखाना सुरु करण्याची मान्यता मिळालेली असून इलेक्ट्रिक गाड्यांच्या आयातीवर काही प्रमाणात सवलत मागितल्यामुळे हा प्रस्ताव अडकून पडला आहे. सरकार स्थानिक उत्पादनावर भर देत असून काही कंपन्यांसाठी आयातीचा दर 15 टक्के कमी करण्याच्या योजनांचा विचार केला जात आहे. माध्यमांच्या माहितीनुसार या निर्णयाला रतन टाटा आणि इतरांकडून विरोध दर्शविण्यात आलाय. टाटा समूहांच्या म्हणण्यानुसार भारतातील इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनाला महत्व देणं गरजेचं आहे, तरीही या वक्तव्यावर अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही निर्णय दिलेला नाही. टाटा कंपनीने वर्ष 2019 मध्ये भारतात इलेक्ट्री गाड्यांच्या उत्पादनाची सुरुवात केली होती आणि सध्या देशांर्गत चालणाऱ्या व्यवसायांमध्ये टाटा समूहाच इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा उत्पादक आहे.