Tesla Project In Gujarat: गेले कित्येक दिवसांपासून जगातील सुप्रसिद्ध कंपनी टेस्लाचे मालक Elon Musk भारतात व्यवसाय सुरू करण्याची इच्छा कायम ठेवून आहेत. मात्र या-ना-त्या कारणामुळे त्यांची ही इच्छा नेहमीच अपूर्ण राहत होती, अनेक दिवस वाट बघितल्यानंतर आता मात्र एलोन मस्क यांना आनंदाची बातमी मिळाली असून ते लवकरच गुजरातमध्ये भारतातील पहिला कारखाना उभारण्याची शक्यता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत केलेल्या दौऱ्याच्या दरम्यान त्यांची आणि एलोन मस्क यांची भेट झाली होती. या भेटी वेळीच टेस्ला भारतात लवकरच गुंतवणूक करेल असे संकेत देण्यात येत होते. आता नेमकी हि गुंतवणूक कोणती असेल हे जाणून घेऊया….
गुजरातमध्ये टेस्टला चा कारखाना उभा राहणार: (Tesla Project In Gujarat)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलोन मस्क यांची अमेरिकेमध्ये भेट झाली होती. या भेटीनंतर साधारण एक वर्षापूर्वी भारतात आयात शुल्क अधिक असल्यामुळे गुंतवणूक न करण्याचा विचार पक्का केलेल्या मस्क यांनी आपला निर्णय बदलला आहे. व लवकरच टेस्टला ही कंपनी भारतातील गुजरात या राज्यामध्ये आपला पहिलावाहिला कारखाना सुरू करेल. या भेटीगाठींच्या दरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी देखील अमेरिकेमध्ये जाऊन टेस्लाच्या एका प्लांटला भेट दिली होती (Tesla Project In Gujarat).
काही काळापूर्वी जेव्हा एलोन मस्क भारतात व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत होते तेव्हा टेस्ला कंपनी कडून गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांचा कारखाना उभारण्यासाठी विचार केला जात. मात्र आता होता कंपनी आणि भारत सरकार यांच्याकडून नवीन निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने गुजरात राज्य सरकारने टेस्ला कंपनीला उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी साणंद, बेचराजी आणि धोलेरा असे तीन प्रदेश आखून दिले आहेत (Tesla Project In Gujarat). वृत्तसंस्था ब्लूंबर्गच्या अहवालानुसार टेस्ला ही सुमारे दोन अब्ज डॉलर्स पासून भारतात गुंतवणूक सुरु करण्याचा विचार करू शकते. सध्या गुजरात या शहरात टाटा मोटर्स, सुझुकी यांचे कारखाने उभे आहेत व लवकरच यात जगप्रसिद्ध टेस्टला या कंपनीचा समावेश होऊ शकतो. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार टेस्लाकडून भारतात कारखाना उभारण्याची घोषणा जानेवारी महिन्यात वायब्रेन्ट गुजरात समिटच्या दरम्यान एलोन मस्क यांच्या उपस्थितीत केली जाईल.