बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर बाजारात या आठवड्यात बंपर कमाईची संधी आहे. याचे कारण म्हणजे या आठवड्यात 6 जून आणि 9 जूनला 2 कंपन्यांचे IPO उघडणार आहेत. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही पैसे कमावू शकता. यामधील LED सेवा देणारी कंपनी आयकियो लाइटिंगचा आयपीओ उद्या 6 जून 2023 रोजी उघडणार असून ८ जूनपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे तर सोनालीस कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचा एसएमई आयपीओ हा 7 जून रोजी उघडणार आहे आणि 9 जूनपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
1) IKIO Lighting IPO –
IKIO Lighting IPO चा IPO 6 जून रोजी उघडेल आणि 8 जून रोजी बंद होईल. म्हणजेच तुम्हाला 3 दिवसांसाठी IPO मध्ये पैसे गुंतवण्याची संधी मिळेल. या आयपीओ च्या माध्यमातून कंपनीने 607 कोटी रुपये उभे करण्याची योजना आखली असून प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे, कंपनी 350 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर जारी करणार आहे. या आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 52 शेअर्सची लॉट साईझ ठेवण्यात आला असून गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकतील. IKIO Lighting IPO ची किंमत 270-285 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
2) Sonalis Consumer Products IPO–
सोनालीस कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचा एसएमई आयपीओ हा 7 जून रोजी उघडणार असून 9 जूनला बंद होणार आहे. सोनालीस कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आयपीओ हा एसएमई आयपीओ आहे. या IPO मध्ये 9.44 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील ज्याची किंमत प्रति शेअर 30 रुपये असेल. सोनालीस कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या IPO चा लॉट साईज 4 हजार शेअर्स आहे. यापूर्वी अनेक कंपन्यांनी त्यांचे IPO बाजारात आणले आहेत. यामधील काही IPO मध्ये गुंतवणूकदारांनी छप्पर फाड के कमाई केली आहे. तर काही IPO मध्ये गुंतवणूकदारांना नुकसानही झेलावे लागलं आहे. त्यामुळे डोकं वापरूनच कोणत्याही IPO मध्ये गुंतवणूक करा.