TATA च्या ‘या’ 4 कंपन्या देत आहेत डिविडेंड; तुमच्याकडे आहे का यापैकी कुठला स्टॉक?

बिझिनेसनामा ऑनलाईन । जर तुम्हाला TATA कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे आवडत असेल तर हि बातमी तुमच्या फायद्याची ठरू शकते. शेअर बाजारातील एक विश्वसनीय उद्योग समूह म्हणून गणला जाणाऱ्या TATA उद्योग समूहाने आपल्या TATA COFFEE ,TATA POWER ,TATA MOTORS आणि TATA STEEL या चार कंपन्यांच्या शेअर गुंवणूकदारांसाठी डिविडेंड घोषित केला आहे. चला तर आज आपण जाणून घेऊयात TATA समूहाच्या कोणकोणत्या कंपन्यांना आणि नेमका किती रुपयांचा डिविडेंड घोषित केला आहे.

1- टाटा कॉफी (Tata Coffee)

शेअर बाजारातील उपलब्ध माहिती नुसार, टाटा कॉफीने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के डेव्हिडन्ट देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच प्रत्येक शेअरमागे गुंवणूकदारांना ३ रुपयांपर्यंत लाभ होऊ शकतो . त्यासाठी कंपनीने १५ मे २०२३ हि रेकॉर्ड डेट घोषित केली आहे . शुक्रवारी Tata Coffee चा भाव हा 0.22 टक्क्यांनी उतरत २२९ रुपयांवर स्थिरावला होता. गेल्या महिनाभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली होती.

2- टाटा पॉवर (Tata Power )

Tata Power कंपनीने प्रत्येक शेअर मागे २ रुपयांचा डिवीडेंट देण्याचा निर्णय घेतला आहे. या डिवीडेंट बाबत अंतिम निर्णय हा १९ जुलै २०२३ रोजी कंपनीच्या १०४ व्या वार्षिक सभेत घेण्यात येईल. काल म्हणजेच शुक्रवारी हा शेअर वाढत ०. ३६ टक्क्यांच्या सरासरी वेगाने २०७. ०५ रूपयांवर पोहचला . गेल्या महिनाभरात ५.४८ टक्क्याने हा शेअर वधारला आहे.

3- टाटा मोटर्स (Tata Motors Dividend)

कंपनीने शुक्रवारी मार्च तिमाही चे निर्णय घोषित केले होते. त्याच वेळी कंपनीने २ रुपयांचा डिवीडेंट देण्याचे सुद्धा घोषित केले होते. तसेच कंपनीने “A “ओर्डनरी शेअर्सवर २.१० रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला होता. गेल्या महिन्याभरात TATA MOTORS शेअर्समध्ये ९ टक्क्यांची तेजी पाहण्यास मिळाली होती जी अजूनही कायम आहे.

4- टाटा स्टील (Tata Steel )

टाटा ग्रुपच्या ह्या कंपनीच्या बोर्डाने देखील डिवीडेंट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये प्रति शेअर्स ३.६० रुपये डिवीडेंट देण्याबाबत चर्चा करण्यात आली ज्यावर अंतिम निर्णय हा कंपनीच्या जुलै महिन्यात होणाऱ्या वार्षिक सभेत घेण्यात येईल.