बिझनेसनामा ऑनलाईन । आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये झपाट्याने वाढ झाली असल्याचे पहावयास मिळाले आहे .सध्या ट्रेडिंग सेशन दरम्यान हा शेअर 10% पेक्षा जास्त झेप घेत 12.70 /- रुपयांची पातळी गाठली आहे. एके काळी 4700 कोटी रुपये मार्केट कॅपिटल असणारे असणाऱ्या ह्या शेअरची 28 मार्च 2023 रोजी किंमत हि 9.05 रुपये होती जी ह्या शेअरची 52 आठवड्यांचा नीचांक दर्शवत होती. तर 6 सप्टेंबर 2022 रोजी ह्या शेअरने 52 आठवड्यांचा उंच्चांक 24.95 किंमत रुपये नोंदवला होता.
रिलायन्स पॉवरच्या तेजीचे कारण-
रिलायन्स पॉवरने त्यांची उपकंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (VIPL) च्या कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जदारांना नवीन प्रस्ताव दिला आहे. या अंतर्गत 1200 कोटी रुपयांचे वन टाइम सेटलमेंट (OTS) अमाऊंट ऑफर करण्यात आली आहे. ऑफरनुसार, कंपनीने कर्जदारांना अंदाजे 1,200 कोटी रुपये रोख अगोदर देण्याची ऑफर दिली आहे. कर्ज देणाऱ्यांमध्ये एक्सिस बँक, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पीएनबी, कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचा समावेश आहे. 31 मार्च 2022 पर्यंत कंपनीचे थकित कर्ज सुमारे 2,200 कोटी रुपये होते.
रिलायन्स पॉवरच्या ओटीएस ऑफरला सिंगापूरस्थित वर्दे पार्टनर्सचा पाठिंबा आहे, जे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ग्रुप कंपनीमध्ये गुंतवणूकदार आहेत . VIPL महाराष्ट्रातील नागपूर येथील बुटीबोरी औद्योगिक परिसरात 600 मेगावॅटचा कोळसा आधारित प्रकल्प चालवते.
रिलायन्स पॉवरच्या शेअरबद्दल बोलायचे झाले तर तो 2008 मध्ये या शेअरची किंमत वाढली अन शेअरचा भाव 275 रुपयांपर्यंत गेला होता. पण नंतर हा स्टॉक 98% ने घसरला आहे. सेन्सेक्सच्या तुलनेत या शेअरमध्ये तीन महिन्यांत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा शेअर एका वर्षाच्या कालावधीत मंदावला होता परंतु दोन वर्ष आणि तीन वर्षांच्या कालावधीत 75% आणि 585% रिटर्न दिला आहे.