एका शेअरवर 377 रुपये Dividend देतेय ‘ही’ फार्मा कंपनी; Ex-डिव्हिडंड, रेकॉर्डही पहा..

बिझिनेसनामा ऑनलाईन । डीव्हीडेंट देणाऱ्या स्टोकवर पैसे लावणाऱ्यासाठी मोठी खुशखबर आहे. फ्रेंच औषध निर्माता कंपनी सनोफीचे भारतीय युनिट, त्यांच्या गुंतवणूकदारांना 1 शेअरसाठी 377 रुपये लाभांश देणार आहे. कंपनीने यासाठी एक्स-डिव्हिडंड आणि रेकॉर्ड डेटही निश्चित केली आहे. 23 फेब्रुवारी रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

संचालक मंडळाच्या या पार पडलेल्या बैठकीत 194 रुपये अंतिम डीव्हीडेंट आणि 183 रुपये डिविडेंडची शिफारस करण्यात आली. कंपनीने या डीव्हीडेंटसाठी २९ एप्रिल २०२३ ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे. कंपनी 22 मे 2023 रोजी किंवा त्याच्या नंतर हा डीव्हीडेंट देईल. सध्या कंपनीच्या एका शेअरची सध्याची किंमत 5,948 रुपये आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 4.70 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

काय करते सनोफी इंडिया

सनोफी कंपनी ही जगातील तिसरी सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी आहे. ही कंपनी अनेक गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणारे जीवनरक्षक लस आणि स्वस्त औषधे पुरवते. 2004 मध्ये, या कंपनीने तिसरी सर्वात मोठी कंपनी बनण्यासाठी दुसरी फ्रेंच कंपनी अवंतिस ताब्यात घेतली होती. 2022-23 च्या आर्थिक वर्षच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 671.90 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यावेळी कंपनीचा खर्च सुमारे 515 कोटी रुपये होता. कंपनीचा निव्वळ नफा 130.90 कोटी रुपये होता. म्हणजेच कंपनीच्या नफ्यात जवळपास 45 टक्के वाढ झाली आहे.