Thomson Laptops In India :आपल्या देशातील मोदी सरकार सध्या मोठ्या प्रमाणात मेक इन इंडिया या अभियानावर भर देऊन काम करत आहे. या अभियानाचा प्रमुख उद्देश म्हणजे इतर कोणत्याही देशावर अवलंबून न राहता, बाजारी मागणी ओळखून, गरजेच्या वस्तू देशातच तयार कराव्यात आणि आयात कमी करावी. परिणामी जास्तीत जास्त पैसे हे देशातच राहतील, नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि देशाच्या विकासात भर पडेल. भारत सरकारकडून वर्ष 2020 मध्ये PLI योजनेची सुरुवात करण्यात आली होती ज्याच्या अंतर्गत जगभरातील कंपन्या भारतातील आपले उत्पन्न तयार करू शकतात, या योजनेमधूनच आता फ्रांस मधील एक मोठी कंपनी थॉमसन (Thomson) भारतात येऊन स्वस्त लॅपटॉप तयार करण्याच्या मार्गावर आहे. म्हटलं जातंय या कंपनी द्वारे तयार करण्यात आलेले लॅपटॉप हे एखाद्या मोबाईल फोन पेक्षा सुद्धा स्वस्त दरात मिळतील.
मिळणार मोबाईल पेक्षाही स्वस्त लॅपटॉप: (Thomson Laptops In India)
फ्रांस मधली ही थॉमसन कंपनी भारतात आपला व्यवसाय करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे त्याचप्रमाणे नोएडा मध्ये असलेल्या समूहाला त्यांनी आपली पहिली ऑर्डर दिली आहे. कंपनीकडून बनवले जाणारे हे लॅपटॉप पॉकेट फ्रेंडली आणि एन्ट्री लेवलचे असतील. या कंपनीचे ग्लोबल जनरल मॅनेजर यांनी दिलेल्या माहितीनुसार पॉकेट फ्रेंडली लॅपटॉपची किंमत 19,990 रुपयांपेक्षा सुद्धा कमी असू शकते. जगभरात सध्या चालणाऱ्या विंडोज 11 आधारित लॅपटॉपला बाजारात आणण्याच्या तयारीत ही कंपनी आहे. या लॅपटॉपची किंमत पाहता आणि त्याच्या असणारे वापर पाहता कोणत्याही मोबाईल फोन पेक्षा स्वस्तात मिळणारा हा लॅपटॉप खरोखरच सामान्य कुटुंबाच्या फायद्याचाच असणार आहे.
या लॅपटॉपचा वापर प्रामुख्याने विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तुमच्या दररोजच्या परिचित असलेल्या शॉपिंग साइट्स जसे की फ्लिपकार्ट, अमेझॉन यावरून तुम्ही लॅपटॉपची खरेदी करू शकता. शिवाय सरकारी मार्केट प्लेस या पोर्टलवर देखील हे लॅपटॉप (Thomson Laptops In India) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कंपनी सध्या एका वर्षात सुमारे एक लाख लॅपटॉप तयार करण्याच्या तयारीत आहे, त्यासाठी त्यांनी जवळपास 250 कोटी रुपये गुंतवले असल्याचे ही स्पष्ट केले आहे.