Threat E-mail to RBI: मुंबईमध्ये बॉम्बस्फोटची धमकी देणाऱ्या गुन्हेगारांना अटक; अर्थमंत्री आणि गव्हर्नरांनी राजीनामा द्यावा म्हणून रचला कट..

Threat E-mail to RBI : देशातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांकडून मुंबईमधल्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाला बॉम्बस्फोट करून उडवण्याची धमकी देण्यात आली होती. हि बातमी मुळातच जीवघेणी असल्याने याचा हादरा अनेकांना बसला. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँकचे कार्यरत गव्हर्नर शतिकांत दास यांनी त्वरित पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. प्रकरणाची गंभीरता लक्ष्यात घेत मुंबई क्राईम ब्राचने त्वरित संपूर्ण घटनेचा तपास सुरु केला आणि आता याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. धमकी देणाऱ्या या ई-मेलमागे असलेले सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची पुढील चौकशी सुरु झाली आहे. काय आहे हे गंभीर प्रकरण आज जाणून घेऊया…

अर्थमंत्र्यांना पदावरून काढण्यासाठी दिली धमकी: (Threat E-mail to RBI)

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास त्यांना त्वरित त्यांच्या पदावरून निष्कासित करण्यात यावं म्हणून काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी मंगळवारी धमकी देणारा एक ई-मेल पाठवला होता. या ई-मेल मध्ये गुन्हेगारांनी मुंबई शहरात असलेल्या रिझर्व्ह बँकच्या कार्यालयासह इतर 11 ठिकाणांवर बॉम्बस्फोट करून लोकंना हानी पोहोचवण्याची धमकी दिली होती, मंगळवारी दुपारी दीड वाजता हा हल्ला होण्याची माहिती देत गुन्हेगारांनी ते खिलाफत इंडिया या समूहाचा भाग असल्याचा दावा केला होता. त्यांनी दिलेली हि धमकी नजरेआड केली जाऊ नये कारण याचे परिणाम भरपूर वाईट होतील असा क्रूर संदेश या ई-मेलमधून जाहीर झाला(Threat E-mail to RBI). मुंबई मधल्या टार्गेटेड एरियामध्ये रिझर्व्ह बँकच्या कार्यालयासह ICICI बँक आणि HDFC बँक यांचाही समावेश होता. मात्र हा सगळा प्रकार भरपूर गंभीर असल्यामुळे त्वरित सर्व प्रकरणाचा तपास सुरु झाला आणि आता गुजरात शहरातील वडोदरा भागामधून 3 गुन्हेगारांना पकडण्यात आलंय.

तिन्ही आरोपींची चौकशी सुरु:

एका धमकीने संपूर्ण देशाला हादरवून टाकलेल्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचने वेळेत पाऊलं उचलल्यामुळे होणारा धोका टाळला आहे. सध्या हे तिन्ही गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची सखोल चौकशी सुरु आहे. तुम्हाला माहिती आहे का? तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार यातील प्रमुख गुन्हेगाराचे नाव आदिल रफिक आहे आणि यात सामील असलेला दुसरा गुन्हेगार त्याच्याच कुटुंबातील असून तिसरा साथीदार त्याचा मित्र आहे (Threat E-mail to RBI). पोलिसांकडून या तिन्ही आरोपींचा तपास सुरु असून तो धमकीचा ई-मेल नेमका कोणत्या डिव्हाईस मधून पाठवण्यात आला होता याची चौकशी सुरु आहे.