Tilak Mehta । आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात ज्या ऐकल्या आणि वाचल्यानंतर त्यावर विश्वास ठेवणं खरोखरच कठीण होऊन बसतं. वयाच्या सतराव्या वर्षी कोणीतरी 100 कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक आहे, असं जर का आम्ही सांगितलं तर यावर तुमचा विश्वास बसेल का? अजिबातच बसणार नाही कारण आपल्या मते हे वय शिक्षण घेण्याचं मित्र-मैत्रिणींबरोबर खेळण्याचं आणि बागडण्याचं आहे. पण आज आम्ही ज्या मुलाची गोष्ट घेऊन आलोय त्या मुलाने कोणीही करून दाखवला नाही असा एक विक्रम करून जगासमोर एक वेगळं उदाहरण ठेवलं आहे, कोण आहे हा सतरा वर्षांचा करोडपती (17 Years Old Businessman) जाणून घेऊया…
कोण आहे हा 17 Years Old Businessman?
आजपर्यंत तुम्ही कित्येक जणांच्या सक्सेस स्टोरीज ऐकल्या असतील. मात्र त्या सर्वांनी आयुष्यात अनेक चढ- उतार पाहून त्यानंतर यश संपादन केलेलं असतं. मात्र आज ज्या मुलाची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याने कोवळ्या वयात केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर शंभर कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. जगाच्या पाठीवर एक वेगळाच विक्रम रचलेल्या या मुलाचं नाव आहे तिलक मेहता.(Tilak Mehta)
तिलक मेहता याने कधीच व्यवसाय सुरू करण्यासाठी आपलं शिक्षण बाजूला सारलं नाही, नवीन युगाच्या शब्दात मांडायचं झालं तर तिलक हा एका अर्थाने मल्टी टास्किंग करतोय. आपला शिक्षण सांभाळून त्याने व्यवसाय सुरू ठेवळा आणि फक्त दोन वर्षातच तो एक यशस्वी उद्योजक बनला आहे. सध्या शाळेत जाण्याच्या वयात हाच छोटा तिलक 200 पेक्षा जास्त लोकांना घर चालवायला मदत करतोय.
कसा सुरू केला व्यवसाय?
तिलक मेहता हा मूळचा गुजरातचा, त्याचा जन्म वर्ष 2006 साली झाला. आपल्या आयुष्यात अशा अनेक घटना घडत असतात ज्यांचा खोलवर विचार केला तर त्यात एक अनोखी निर्मिती घडवून दाखवण्याची ताकद असते. तिलकनेही आपल्या दैनंदिन जीवनातून अशीच एक कल्पना निवडली आणि आपला व्यवसाय सुरू केला. तो त्याच्या वडिलांना ऑफिसमधून आल्यानंतर काहीतरी सामान आणायला सांगायचा आणि थकलेले वडील त्याला नकार द्यायचे, या छोट्याशा घटनेमधून तिलकने (Tilak Mehta) पुस्तकांची होम डिलीट करण्याचा विचार केला.
काही काळातच आपला हा विचार त्याने त्याच्या वडिलांना बोलून दाखवला आणि वडिलांनीही त्वरित त्याची ओळख बँक अधिकारी घनश्याम पारेख यांच्यासोबत करून दिली. घनश्याम पारेख आणि तिलक यांनी हात मिळवणी करून पेपर अँड पार्सल नावाची कुरिअर सेवा सुरू केली, ज्याचे CEO स्वतः घनश्याम पारख होते. त्यांची कंपनी शिपिंग आणि लॉजिस्टिक्सच्या संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. आज ही ऑनलाईन माध्यमांचा वापर करून व्यवसाय करणारी एक मोठी टीम आहे.
या छोट्या उद्योजकाकडे आज 200 कर्मचारी काम करतात आणि त्याबरोबरच 300 पेक्षा अधिक डबेवाले देखील जोडले गेले आहेत. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दररोज हजारो पार्सल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते आणि यासाठी 40 ते 180 प्रमाणे दर आकारला जातो. हे वाचून तुम्ही कदाचित थक्क व्हाल पण तिलक मेहता याची वर्ष 2021 मध्ये एकूण संपत्ती 65 कोटी रुपयांची होती तर त्याचे मासिक वेतन हे दोन कोटी रुपयांचे होते.