Tips For Silver Buying : आज धनत्रयोदशी असून या शुभ दिवशी आपण सोन्याची खरेदी करतोच, पण काही घरं अशीही असतील हि अश्यावेळी चांदीची खरेदी करण्यावरही भर देतात. अलीकडे सोन्या-चांदीचे भाव कमी होत असल्याने यांची खरेदी करू पाहणाऱ्यांसाठी हि पर्वणीच म्हणावी लागेल.आपल्याकडे सोन्याच्या खरेदीबद्दल एवढी चर्चा केली जाते कि चांदीची खरेदी नेमकी कशी करावी या बद्दल फारसं कोणी बोलताना दिसत नाही, आज आम्ही याच विषयावर चर्चा करणार आहोत..
चांदीच्या वस्तू खरेदी करताना या गोष्टी कधीही दुर्लक्ष्य करू नका: (Tips For Silver Buying)
१) चांदीची शुद्धता:
सोन्याची खरेदी करताना जशी शुद्धता महत्वाची असते तशीच चांदीच्या खरेदीवेळी सुद्धा शुद्धता फारच महत्वाची आहे. तुम्ही जी चांदी खरेदी करत आहात त्यावर हॉलमार्क आहे याची खात्री करून घ्या. खरे व प्रतिष्ठित डीलर्स नेहमीच ते खरे आहे असं सांगणारे प्रमाणपत्र देतात. शुद्ध चांदी 99.9( 999 सिल्व्ह फाईनेस) पासून सुरु होते व 80(800 फायनेस) पर्यंत कमी होऊन शुद्धतेच्या श्रेणीमध्ये विकली जाते.
२) हॉलमार्क तपासून पहा:
कधीही चांदीची खरेदी करताना (Tips For Silver Buying) त्याच्यावर असणारा हॉलमार्क तपासून पाहणं फारच महत्वाचं आहे .द ब्युरो ऑफ इंडियन स्टेन्डडर्ड(The Bureau of Indian Standards) यांच्याकडून चांदीच्या वस्तूंवर एक लोगो दिला जातो, त्यावर तो दागिने कुठे व कधी बनला आहे याची माहिती दिलेली असते. आणि हा हॉलमार्क असली वस्तू शुद्ध म्हणून ग्रहय धरता येते.
३) किंमत न बघता खरेदी करणे:
तुमच्या शहरात चांदीची काय किंमत चालू आहे हे तपासूनच नंतर खरेदी करावी, तुम्हाला खरी किंमत माहिती असल्यामुळे सोनार खोटे भाव सांगून तुम्हाला फसवू शकत नाही. चांदीच्या किमती या सतत बदलत असतात त्यामुळे बाजाराकडे नेहमीच लक्ष असलं पाहिजे.
४) चांदी तपासून घ्या:
चांदी खरी आहे कि भेसळ आहे हि तपासून घेण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे मेगनेटचा वापर करणे, खरी चांदी हि कधीच मेगनेटला चिकटणार नाही. पण जर का त्याच्यात भेसळ केलेली असेल तर फरक ओळखणं सोपं जाईल.
५) अनोळखी व्यापाऱ्याकडून चांदी विकत घेणे:
कधीही अनोळखी व्यापाऱ्यावर विश्वास ठेऊन कधीही चांदी सारखी मौल्यवान वस्तू खरेदी करू नका. ते कदाचित तुम्हाला कमी किमतीत सोनं उपलब्ध करून देतील पण त्यात नक्कीच भेसळ केलेली असेल.