Titagarh Rail Systems Share Price : रेल्वेच्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; काय आहेत तेजी मागील कारणे?

बिझनेसनामा ऑनलाईन । सध्या देशातील अनेक जणांचा कल हा शेअर मार्केट (Titagarh Rail Systems Share Price) कडे वळला आहे. नोकरीतील अस्थिरता, वाढती महागाई आणि व्यवसायातील जोखीम या तिन्ही महत्वाच्या कारणांनी तरुण मुलेही शेअर मार्केट मध्ये आपला इंटरेस्ट दाखवत आहेत आणि शेअर मार्केटच्या माध्यमांतून पैसे कमवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु शेअर मार्केट सुद्धा तस काही प्रमाणात जोखमीचेच… कधी कोणता शेअर्स वर जाईल आणि कोणता शेअर्स आदळेल हे समजून घेण्यासाठी आपल्याकडे त्याबाबतचे संपूर्ण ज्ञान असं गरजेचं आहे. तरीही असे अनेकजण आहेत जे रोज शेअर मार्केटच्या माध्यमातून बक्कळ पैसे कमवत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअर बाबत सांगणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

भारतीय रेल्वेशी संबधित असलेल्या टीटागढ रेल सिस्टीम (Titagarh Rail Systems Share Price) या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फायदा करून दिला आहे. टीटागढ रेलने मागील 3 वर्षात आपली शेअर बाजारात चांगलीच पकड मिळवली आहे. अनेक नवीन ऑर्डर्ससह टीटागढ रेलमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगलाच फायदा मिळाला आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मागील ३ वर्षाच्या काळात एकूण १६ पट रिटर्न मिळवून दिला आहे. म्हणजेच उदाहरणार्थ, जर कोणी 3 वर्ष्यापूर्वी कंपनीच्या शेअर मध्ये 1 लाख गुंतवले असते त्यांना 16 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळाला आहे. तसेच 1 महिन्यापासूनही टीटागड रेल सिस्टम स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के नफा दिला आहे.

तेजीचे कारण काय? Titagarh Rail Systems Share Price

टिटागड रेल फॅक्टरी शेअर्सच्या या तेजीची कारणेही समजून घ्या. गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून टीटागढ रेल्वे सिस्टीमला 857 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली. त्यामुळे कंपनीच्या शेअर्सची चांगलीच गती पकडली. याशिवाय, आत्ताच उद्घाटन झालेल्या पुणे मेट्रोचे रेल्वे कोच देखील टिटागड रेल फॅक्टरीने बनवलेले आहेत. त्यामुळे येत्या काळातही हा शेअर्स वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे टिटागड रेल फॅक्टरी-

1980 च्या दशकात रोलिंग स्टॉक फाउंड्री युनिट म्हणून स्थापित, टीटागढने भारतीय रेल्वेसाठी बोगी आणि कप्लर्स सारख्या रेल्वे कास्टिंगची निर्मिती करून आपला प्रवास सुरू केला. 1997 पर्यंत, टिटागढने आपली पहिली रेल्वे मालवाहू वॅगन तयार केली होती. भविष्यातील प्रयत्नांसाठी एक बेंचमार्क म्हणून काम केले आणि टिटागढला भारतीय बाजारपेठेत प्रमुख स्थान मिळाले .सध्या कोलकत्ता येथे कंपनीचे मुख्यालय असून टिटागड समूह मालवाहतूक आणि प्रवासी रोलिंग स्टॉकचा एक अग्रगण्य उत्पादक आहे.