बिझनेसनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वेचे डब्बे आणि कोच बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या टिटागड रेल सिस्टीमच्या (Titagarh Rail Systems) शेअर्स मध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीने BSE वर म्हणजेच बॉम्बे स्टोक एक्सचेंज मध्ये 481.55 रुपयांचा विक्रमी उच्चांक देखील गाठला आहे. हा शेअर BSE वर सोमवारी 9.76 टक्क्यांनी वाढून 466.70 रुपयांवर बंद झाला. त्याची संपूर्ण मार्केट कॅप 5580.38 कोटी रुपये एवढी आहे.
दोन मोठे करार जिंकल्यामुळे टिटागड रेल सिस्टीमच्या शेअर्स मध्ये (Titagarh Rail Systems) जोरदार खरेदी झालेली आहे. परंतु प्रॉफिट बुकिंग मुळे या किमतीमध्ये मंदी आल्याचे दिसून आलं. रेल्वे मंत्रालयाच्या आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत 15.4 बनावट चाकांचा पुरवठा करण्याचे कॉन्ट्रॅक्ट टिटागड रेल सिस्टीम्स आणि रामकृष्ण फोर्जिंग्स च्या ग्रुप ला मिळाला आहे. हा करार सुमारे 12 लाख 2026.5 कोटी रुपयांचा आहे. या कॉन्ट्रॅक्ट नुसार कंसोर्टियमने २० वर्षाच्या कालावधीमध्ये बनावट चाकांचे उत्पादन आणि पुरवठा करण्याचे काम कंपनी करेल. त्यापैकी पहिल्या वर्षी 40,000 चाकं, दुसऱ्या वर्षी 60000 आणि दरवर्षी 80 हजार चाकं पुरवली जातील. 12,226.5 कोटी रुपयांचा हा एकूण करार आहे. याशिवाय टिटागड रेल सिस्टीम्स आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या कंसोर्टियमला वंदे भारत स्लीपर गाड्यांचे 90 संच तयार करण्याचे कंत्राट रेल्वेने दिले आहे. या २ करारांमुळेच टिटागड रेल सिस्टीम्सच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
मागच्या वर्षी 20 जूनला टीटागड रेल सिस्टिमचे शेअर्स ची किंमत फक्त 93.35 रुपये होती. परंतु अवघ्या एका वर्षात या शेअर्समध्ये घसघशीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. फक्त एकच वर्षात टीटागड रेल सिस्टिमचे शेअर्स 416 टक्क्यांनी वाढून 481.55 रुपयांवर पोचला आहे. टिटागड रेल्वे सिस्टीम ही रेल्वे वॅगन आणि रेल्वे कोच तयार करणारी खाजगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. येत्या काही दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.