Top 10 Richest People In India: कोण आहेत भारतातील 10 श्रीमंत लोकं? जाणून घ्या

Top 10 Richest People In India: भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होत असून सोबतच अनेक उद्योगपतींच्या संपत्तीमध्येही प्रचंड वाढ होत आहे. याचं प्रतीक म्हणजे Forbes 2024 World’s Billionaires List मध्ये 186 भारतीयांचा समावेश होय, मागच्या वर्षी ही संख्या 169 होती.

भारतातील श्रीमंत व्यक्तींमध्ये अंबानी अजूनही अव्वल : (Top 10 Richest People In India)

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले, फक्त भारतातच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 9व्या क्रमांकावर आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अंबानींची net worth 117.5 बिलियन (8.8 लाख कोटी) आहे.

दुसऱ्या क्रमांकावर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आहेत. त्यांची net worth 84.8 बिलियन (6.4 लाख कोटी) असून ते जगातील 17 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. HCL Technologiesचे संस्थापक शिव नादर हे भारतातील तिसरे आणि जगातील 42 वे श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची net worth 36.7 बिलियन (2.7 लाख कोटी) आहे.

भारतातील श्रीमंत व्यक्ती आणि त्यांची संपत्ती:

JSW ग्रुपच्या मालक सावित्री जिंदल आणि कुटुंब भारतातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. 31.5 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीच्या जोरावर त्यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत 50वा क्रमांक पटकावला आहे. Sun Pharmaceuticals Industries Limited चे चेअरमन दिलीप सांघवी 25.8 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह भारतातील 5व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. देशातील पहिल्या फार्मा कंपनीचे मालक असलेले सांघवी जगातील 71व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

सायरस पुनावाला सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक, भारतातील 6व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत(Top 10 Richest People In India). 21.8 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह ते जगातील 90व्या क्रमांकावर आहेत. DLF Limited चे मालक कुशाल पाल सिंह 21.3 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह भारतातील 7व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून ते जगातील श्रीमंतांच्या यादीत ते 98 व्या क्रमांकावर आहेत.

कुमार मंगलम बिर्ला आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष, देशातील 8व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. 17.2 बिलियन डॉलर संपत्ती असलेले बिर्ला जगातील 96व्या क्रमांकावर आहेत. राधाकृष्णन दमानी, DMart आणि Avenue Supermartsचे मालक भारतातील 9व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत आणि 17.2 बिलियन डॉलर संपत्ती असलेले दमानी जगातील 103व्या क्रमांकावर आहेत. लक्ष्मी मित्तल, ArcelorMittalचे मालक भारतातील 10 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत, तर 16.4 बिलियन डॉलर संपत्ती असलेले मित्तल जगातील 107 व्या क्रमांकावर आहेत.