Top 10 Richest Person In The World : जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर; पहा कोणाची संपत्ती किती?

Top 10 Richest Person In The World । दुनियेत अनेक श्रीमंत लोकांचे राज्य आहे. ज्यात भारतातील अदानी व अंबानीचा समावेश आहे. या लक्षाधीशांच्या ( Billionaire People) संपत्तीत देवसेंदिवस चढ उतार पाहायला मिळतात. याचं प्रमुख कारण म्हणजे जगतील बाजारात होणारे बदल आहेत. आज आपण जगातील टॉप 10 श्रीमंत लोकांची नावे आणि त्यांची एकूण संपत्ती याबाबत जाणून घेणार आहोत. आत्तातरी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk हेच आहेत आणि या नंतर Bernard Arnault यांचं नाव समोर येतं. त्याच प्रमाणे भारतातील मुकेश अंबानी आणि गौतम अदानी कितव्या क्रमांकावर आहेत हे सुद्धा पाहूया.

जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्ती – Top 10 Richest Person In The World

१) एलन मस्क (Elon Musk) –

जगातील श्रीमंतांच्या (Top 10 Richest Person In The World) यादीत सर्वात पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे Elon Musk याचं. त्यांचे एकूण Net Worth 226 अरब डॉलर्स आहे. ते टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्वीटर या कंपन्यांचे मालक आहेत. मागच्या 24 तासांत त्यांच्या संपत्तीमध्ये 9.35 अरब डॉलर्सचा घट झाली असली तरी ते अजूनही टॉपवर आहेत .

२) बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) –

हे जगातील दुसऱ्या स्थानावरील लक्षाधीश आहेत. त्यांचं एकूण Net Worth 183 अरब डॉलर्स आहे. ते सध्या बनार्ड अर्नाल्ट फ्रांस चे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या संपत्तीमध्ये मागच्या 24 तासांत 3.04 अरब डॉलर्सची घट झालेली आहे.

३) जेफ बेजोस (Jeff Bezos) :

सुप्रसिद्ध online shopping site Amazon चे Jeff Bezos मालक यांचा Net Worth 162 अरब डॉलर्स आहे.

४) Larry Ellison-

हे विश्वातील चौथे लक्षाधीश आहेत. त्यांची Net Worth 134 अरब डॉलर्स आहे. त्यांनी केलेली Oracle ची स्थापना हाच त्यांच्यासाठी turning point ठरला व इथून पुढे त्यांनी दुनियेवर राज्य करायला सुरुवात केली.

५) बिल गेट्स (Bill Gates)-

Bill Gates ह्यांनी Software क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे हे आपण सर्वच जाणतो. ते Microsoft चे संस्थापक व पूर्व CEO आहेत. Microsoft हे नाव जगभरात प्रसिद्ध आहे व Bill Gates यांची Net Worth 129 डॉलर्स आहे.

६) लैरी पेज (Larry Page) –

आजकाल Google शिवाय आपलं पण हलत नाही, अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपण Google वर निर्भर आहोत. याच Google चे संस्थापक हे या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची NET Worth 122 अरब डॉलर्स आहे.

७) वॉरेन बफे (Warren Buffett) –

हे Berkshire Hathaway चे CEO व चेअरमन आहेत. या कंपनीला Oracle Of Omaha म्हणून जगभरात ओळखलं जातं. Warren Buffett हे Coca Cola, IBM, Apple, American Express सारख्या कंपनी सोबत भागीदार आहेत. आणि या भागीदारीतून ते दरवर्षी भरपूर कमाई करतात.

८) सर्गेई ब्रिन (Sergey Brin)-

हे दुनियेतील आठवे श्रीमंत व्यक्ती आहेत. ते Google चे सह संस्थापक आहेत. त्यांनी व Warren Buffett यांनी मिळून Google ची सुरुवात केली होती. सध्या Google Gmail, YouTube, Search Engine इत्यादी technical सुविधा देऊ करते.

९ ) स्टीव बाल्मर (Steve Ballmer)-

श्रीमंतांच्या यादीत ९ व्या क्रमांकावर Steve Ballmer आहेत. Steve Ballmer हे सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचा माजी सीईओ आहे.

१०) मार्क जुकरबर्ग (Mark Zhukerberg) –

Mark Zhukerberg हे Facebookचे संस्थापक व CEO आहेत, यांनी वर्ष 2004 मध्ये Facebook ची सुरुवात केली होती. जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत ते १० व्या क्रमांकावर आहेत.

अंबानी- अदानी कितव्या क्रमांकावर?

Gautam Adani आणि Mukesh Ambani: हे भारतीय उद्योगपती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये (Top 10 Richest Person In The World) अनुक्रमे 21 व्या आणि 12 व्या स्थानावर आहेत.