बिझनेसनामा ऑनलाईन । इंडिया के हर गली मै क्रिकेट है त्यामुळे त्याचा चाहता वर्ग हि मोठ्या प्रमाणात आहे. याच क्रेझमुळे भारताने सुरु केलेले इंडियन प्रीमियर लीग (IPL Playoffs) जगातील सर्वात लोकप्रिय व श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून उभारून आली. इंडियन प्रीमियर लीग (IPL) हे दरवर्षी कमीत कमी 35 हजार करोड रुपयांचा रेवेन्यू जनरेट करते आणि याचाच फायदा लीग मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना सुद्धा होतो. आयपीएल (IPL) मध्ये आतापर्यंत बऱ्याच खेळाडूंनी 100 कोटी किंवा त्याहून अधिक कमाई केली आहे. IPL मध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक कमाई करणारे टॉप 3 खेळाडू कोण आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत.
रोहित शर्मा (Rohit Sharma)
हिट मॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा हा या रेस मध्ये सर्वात आघाडीवर आहे. रोहित शर्मा आधी ३ वर्ष डेक्कन चार्जेस कडून आणि गेली १३ वर्ष मुंबई इंडियन्स टीम कडून खेळत आहे. तो १० वर्ष मुंबई इंडियन्स टीमच्या कर्णधार पदी आहे. आयपीएल करियरबद्दल बोलायच झाल्यास तो आतापर्यंत 234 सामने खेळला असून त्याने मुंबईला पाच वेळा आयपीएल (IPL) ट्रॉफी जिंकून दिली आहे. याचबरोबर तो आयपीएलच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूच्या यादीत सर्वात आघाडीवर आहे. त्याने स्पर्धेतील इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त पैसे कमावले आहेत. त्याने आयपीएलमधून एकूण 178.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
एमएस धोनी (M S Dhoni)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएल (IPL) स्थापनेपासून चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळत असून टीम चा कर्णधार आहे. एमएस धोनी आयपीएल (IPL) च्या सर्वात पहिल्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू देखील होता. धोनीने रायझिंग पुणे सुपरजायंट (RPSG) साठी दोन सीजन खेळले आहेत. ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनी आतापर्यंत 234 सामने खेळला असून त्याने चेन्नई सुपर किंग्सला चारवेळा आयपीएल (IPL) ट्रॉफी जिंकून दिली आहे. धोनीला चेन्नई सुपर किंग्स टीम चा ‘थाला’ म्हणून ओळखलं जातं. आयपीएलच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूच्या यादीत एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर येतो. त्याने आयपीएलमधून एकूण 176.84 कोटी रुपयेची कमाई केली आहे.
विराट कोहली (Virat Kohli)
जगात क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅट मध्ये सर्वात टॉपला असलेला प्लेयर किंग कोहली या यादीत कसा मागे पडेल? आयपीएल (IPL) स्थापनेपासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम कडून खेळत आहे. त्याने ९ वर्ष टीम चे कर्णधार पद सांभाळले आहे. त्याने आपल्या फलंदाजी च्या आधारावर अनेक मॅचेस जिंकावल्या आहेत. त्यामुळे तो रन मशीन म्हणून प्रसिद्ध आहे.
विराट कोहली ने एकूण 232 आयपीएल सामने आणि 225 इनिंगमद्ये 6969 धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळताना विराट कोहलीने सर्वाधिक कमाई केली आहे. आयपीएलच्या (IPL) आतापर्यंतच्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलमधून एकूण १७३.२ कोटी रुपयेची कमाई केली आहे.