Top 5 AI Stocks In India । सध्या शेअर मार्केटमध्ये चांगली तेजी आल्याचे चित्र आहे. कोरोनानंतर शेअर बाजाराला गती मिळाल्याचे बोलले जाते. अनेक नवीन गुंतवणूकदार आता शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत आहेत. अलीकडे सर्वसामान्य माणूसही आपली काही सेविंग शेअर मार्केटमधील stocks मध्ये गुंतवून अधिक नफा कमावण्याचा प्रयत्न करत आहे. अशात आगामी काळासाठी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सर्वच स्तरांत आपला दबदबा निर्माण केला आहे. आगामी काळात AI आधारित कंपन्यांना चांगले दिवस येतील असे सांगितले जात आहे. आज आपण भारतातही टॉप AI स्टॉक कोणते हे जाणून घेणार आहोत.
2028 पर्यंत AI ठरणार सर्वात मोठे मार्केट
IMARC समूहाच्या अहवालानुसार, २०२८ पर्यंत US$ ३,९३५.५ दशलक्ष अंदाजित बाजारपेठेसह AI हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक ठरणार आहे. २०२८ पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जगातील सर्वात मोठे मार्केट निर्माण करू शकते. मशीनलर्निंग, नेचरल लेंगवेज प्रोसेसिंग आणि कॉम्प्युटर व्हिजनमधील प्रगतीसह, AI विविध क्षेत्रांमध्ये क्रांती घडवून आणत नवीन गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. म्हणूनच Top 5 AI Stocks In India याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
AI स्टॉक्स म्हणजे काय?
AI स्टॉक्स हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीच्या विकासात गुंतलेल्या कंपनींचे स्टॉक्स (Top 5 AI Stocks In India) आहेत. या कंपन्या मशीनलर्निंग, नेचरल लेंगवेज प्रोसेसिंग,रोबोटिक्स किंवा इतर AI संबंधित क्षेत्रात कार्यरत असतात. AI आरोग्यसेवा, वित्तसेवा वाहतूक आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रांमध्ये वेगाने परिवर्तन करत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर बुद्धिमान प्रणाली विकसित करण्यासाठी केला जातो. यात मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण करणे, नियमित कार्ये स्वयंचलित करणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेता येतात.
भारतातील सर्वोत्तम AI स्टॉक्समध्ये गुंतवणूक का करावी?
येत्या काही वर्षांत AI उद्योगांची झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे गुंतवणुकीवर मोठा रिटर्न मिळण्याची क्षमता निर्माण होते. AI संबंधित कंपन्यांसह विविध उद्योगांमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. AI तंत्रज्ञानाची वाढती मागणी दीर्घकालीन टिकाऊपणा दर्शवते. AI हे भविष्यात नावीन्यपूर्णतेचे प्रमुख चालक असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे AI संबंधित कंपन्यांसाठी नवीन संधी निर्माण होतील.
AI संबंधित लक्षणीय कामगिरी करणाऱ्या भारतीय कंपन्य (Top 5 AI Stocks In India)
१) TATA Elxsi –
टाटा समूहाच्या (TATA GROUP) शेअर्सवर गुंतवणूकदारांचा नेहमीच अधिक विश्वास असतो. टाटा समूहाचीच्या TATA Elxsi या आयटी कंपनीने मागील काही दिवसांत गुंतवणूकदारांना अतिशय मोठा परतावा दिला आहे. Tata Elxsi च्या शेअर्सच्या किमती जवळपास 50,000 टक्के ने वाढल्या आहेत. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 17 रुपयांवरून 8600 रुपयांपर्यंत वाढले आहेत. TATA Elxsi हि प्रामुख्याने AI वर काम करणारी भारतातील एक प्रमुख कंपनी आहे. म्हणूनच तुम्ही यामध्ये गुंतवणूक करून आगामी काळात मोठा नफा कमावू शकता.
TATA Elxsi share price – 7,546.35 INR
२) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) :
टीसीएस ही भारतातील सर्वात मोठ्या IT सेवा कंपन्यांपैकी एक आहे आणि Al उद्योगात लक्षणीय कामगिरी करत आहे. कंपनीने AI रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून ग्राहकांसाठी अनेक AI आधारित उपाय विकसित केले आहेत. टीसीएसच्या स्टॉक्समध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यपूर्ण वाढ पहायला मिळते.
TCS Share Price – 3,472.40 INR
३) इन्फोसिस (Infosys) :
इन्फोसिस ही भारतीय IT सेवा उद्योगातील आणखी एक प्रमुख कंपनी Al संशोधन आणि विकासामध्ये सक्रियपणे गुंतवणूक करत आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अनेक AI आधारित उपाय विकसित केले असून. त्याच्या स्टॉक्समध्ये गेल्या काही वर्षांत स्थिर वाढ दिसून आली आहे.
Infosys Share Price – 1,434.80 INR
४) विप्रो (Wipro) :
विप्रो ही एक भारतीय बहुराष्ट्रीय IT सेवा कंपनी आहे जी अनेक उद्योगांमधील ग्राहकांना AIआधारित समाधाने प्रदान करते. AI संशोधन आणि विकासामध्ये सक्रियपणे गुंतवणूक करत आहे आणि तिच्या ग्राहकांसाठी अनेक AI- आधारित उपाय विकसित केले आहेत.
Wipro Share Price – 414.75 INR
५) एचसीएल टेक्नोलॉजीस (HCL Technology) :
एचसीएल टेक्नोलॉजीस ही आणखी एक भारतीय IT सेवा कंपनी आहे जी अनेक उद्योगांमधील ग्राहकांना AI आधारित उपाय पुरवते. कंपनीने AI रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि ग्राहकांसाठी अनेक AI आधारित उपाय विकसित केले आहेत.
HCL Tech Share Price – 1,153.80 INR
AI संबंधित स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी विचारात घेण्यासारखे घटक
१) कंपनीची आर्थिक स्थिती:
भारतातील कोणत्याही AI स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची आर्थिक स्थिती सुदृढ आहे याची खात्री करण्यासाठी त्याच्या आर्थिक विवरणांचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे.
२) कॉपिटेटीव्ह लँडस्केप:
भारतातील AI उद्योग अत्यंत स्पर्धात्मक आहे, अनेक प्रतिस्पर्धी बाजारपेठेतील वाटा मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी, कंपनीच्या उद्योगातील स्थितीचे मूल्यांकन करणे आणि त्याच्या स्पर्धात्मक फायद्याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे.
३) नियामक वातावरण:
AI संबंधित तंत्रज्ञानाच्या आसपासचे नियामक वातावरण सतत विकसित होत आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी, भारतातील नियामक लँडस्केपचे मूल्यमापन आणि कंपनीच्या वाढीच्या संभाव्यतेवर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो याचे मूल्यांकन करावे.
४) मार्केट मधील शक्यता:
AI संबंधित गुंतवणूक करण्याचा विचार असलेल्या कंपनीच्या बाजारातील संभाव्यतेचा विचार करावा. भारत आणि परदेशातील Al तंत्रज्ञानाच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी सुस्थितीत असलेल्या कंपन्या ग्राह्य धराव्यात.