‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त Home Loan; पहा किती आहे व्याजदर?

बिझनेसनामा ऑनलाईन । स्वतःचं घर घेणं हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. प्रत्येकाला आलिशान घर असावं, असं वाटतं परंतु प्रत्येकाकडून हे स्वप्न पूर्ण होत नाही. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण धावपळ करत असतो. बरेच जण मोठी रक्कम कमावून किंवा जमा करून पैसे जमा करतात आणि स्वतःच घर घेतात तर बरेच जण होम लोन हा पर्याय वापरून देखील घर घेतात. पण काहींना होम लोन बद्दल अजूनही माहिती नाही. जर तुम्ही सुद्धा घर घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला काही बँका ज्या कमी व्याजदरामध्ये होम लोन देतात यांची माहिती घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आरबीआयने रेपो रेट वाढवल्यामुळे होम लोन आणि कोणत्याही प्रकारच्या लोन वर मोठ्या प्रमाणात व्याज आकारले जात असले तरीही बऱ्याच बँका कमी व्याजामध्ये होम लोन देत आहेत. त्यासाठी आज आपण होम लोन कोणकोणत्या प्रकारचे आणि कोणकोणत्या बँक देतात हे पाहणार आहोत.

युको बँक –

सध्या युको बँक बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया एचडीएफसी बँक एसबीआय एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि बजाज हाऊसिंग फायनान्स हे प्रत्येक वर्षी 8.50 टक्के व्याजावर होम लोन ऑफर करतात. परंतु रेपो रेट वाढल्यामुळे आता यामध्ये देखील वाढ झाली आहे. युको बँकेतून 30 ते 75 लाखापर्यंत लोन घेतल्यास 8.45% ते 10.30% आणि 75 लाखापेक्षा जास्त लोन घेतल्यास 8.45% ते 10.30% व्याज आकारले जाईल.

बँक ऑफ बडोदा –

जर तुम्ही बँक ऑफ बडोदा मधून होम लोन घेऊन इच्छित असाल तर 30 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला 8.60 ते 10.65 टक्के व्याजावर मिळू शकते. आणि 30 ते 75 लाख पर्यंत लोन घेणार असाल तर 8.60% ते 10.65% व्याज त्याचबरोबर तुम्ही 75 लाख पेक्षा जास्त लोन घेणार असाल तर 8.60% ते 10.90% पर्यंत व्याज लावून होम लोन दिले जाते

पंजाब नॅशनल बँक-

जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेतून लोन घेतल्यास 30 ते 75 पर्यंत 8.60% ते 9.50 टक्के, त्याचबरोबर 75 लाखापेक्षा जास्त लोन घेतल्यास 8.60% ते 9.50% व्याज लावल्या जाईल. जर तुम्ही पंजाब अँड सिंधि बँकेतून लोन घेतल्यास30 ते 75 लाख पर्यंत 8.85% ते 9.95% व्याज घेतले जाते. त्याचबरोबर हे लोन 75लाखापेक्षा जास्त असेल तर 8.85% ते 9.95% व्याज घेतले जाते.

स्टेट बँक ऑफ इंडिया-

स्टेट बँक ऑफ इंडिया मधून 30 लाख ते 75 लाख पर्यंत लोन घेतल्यास 8.50% ते 10.05% व्याज, 75 लाखापेक्षा जास्त लोन घेतल्यास 8.50% ते 10.5% व्याज लावल्या जाते.

युनियन बँक ऑफ इंडिया-

युनियन बँक ऑफ इंडिया मधून 30 ते 75 लाखापर्यंत कर्ज घेतल्यास 8.50% ते 10.95% व्याज घेतले जाईल. त्याचबरोबर 75 लाखाच्या पुढे 8.50% ते 10.95% व्याज घेतले जाईल.

बँक ऑफ इंडिया –

बँक ऑफ इंडिया मधून कर्ज घेतल्यास 30 ते 75 लाखांपर्यंत 8.45% ते 10.75% व्याज लावण्यात येते. तसेच 75 लाखापेक्षा जास्त लोन घेतल्यास 8.45% ते 10.75 टक्के व्याज घेतले जाते.

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र मधून लोन घेतल्यास 30 ते 75 लाखापर्यंत 8.60% पासून पुढे व्याज लावण्यात येते.

कॅनरा बँक –

कॅनरा बँकेतून लोन घेतल्यास 30 ते 75 लाखापर्यंत 8.5% ते 11.25%व्याज घेतले जाते. त्याचबरोबर 75 लाखाच्या पुढे 8.55% ते 11.25 टक्के व्याज घेतले जाते.