बिझनेसनामा ऑनलाईन । मागील काही दिवसांपूर्वी वाईनची विक्री भारतात मोठ्या प्रमाणात झाली होती. काही वर्षांपासून भारतातच नाही तर जगामध्ये वाईन उद्योग मोठ्या संख्येने वाढत आहे. त्याचबरोबर देशातील सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय म्हणजे मद्य उद्योग. त्यानुसार आपण दारू पिण्यापेक्षा दारू विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात रिटर्न मिळू शकतो. जर आपण या कंपन्यांमध्ये लॉन्ग टर्म गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. स्टॅटिस्ट्राच्या रिपोर्टनुसार 2021 ते 2026 या काळामध्ये मद्य व्यवसाय हा 6.5 टक्क्यांनी सीएजीआर ने वाढण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये जागतिक मध्य बाजाराचा आकार हा 1624 अब्ज डॉलर एवढा होता. आता 2031 पर्यंत हा आकडा 2036.6 अब्ज डॉलर पर्यंत वाढण्याची शक्यता असून याचा फायदा भारतीय कंपन्यांना देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्याचबरोबर युनायटेड स्पिरिट चा शेअर आज 1012 वर असून या शेअरचा मार्केट कॅप हा 73,633 कोटी रुपये एवढा आहे. कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 3 वर्षांमध्ये आतापर्यंत 75 टक्के रिटर्न दिलेला असून युनायटेड स्पिरीट प्रमाणेच युनायटेड ब्रुअरीज या कंपनीचा शेअर 1539 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्यानुसार या शेअरचे मार्केट कॅप चाळीस हजार 701 कोटी रुपयांपर्यंत आहे. या कंपनीच्या शेअर्सने तीन वर्षांमध्ये 62% रिटर्न्स दिला आहे.
सुला विनयार्ड्सचा शेअर सध्या 511 रुपयांवर असून या शेअरचे मार्केट कॅप 4313 कोटी रुपये एवढा आहे. हा शेअर नुकताच लिस्ट करण्यात आला असून एक जानेवारी पासून आतापर्यंत या शेअरने 54% रिटर्न दिला आहे. रेडिगो खेतानचा शेअर 1411 रुपयांवर असून या शेअरचा मार्केट कॅप 18,861 कोटी रुपये एवढा आहे. तीन वर्षांमध्ये या कंपनीने 283% रिटर्न दिला आहे.
ग्लोबल स्पिरीट या कंपनीचे चा शेअर सध्या 980 रुपयावर असून 2821 कोटी रुपये मार्केट कॅप या शेअरचे आहे. या कंपनीचा शेअर नुकताच लिस्ट करण्यात आलेला आहे.ग्लोबल स्पिरीट या कंपनीच्या शेअरने एक जानेवारीपासून आतापर्यंत 17% रिटर्न दिले आहे. टिळकनगर इंडस्ट्रीजचे शेअर 170 रुपयांवर व्यवहार करत असून या शेअरचे मार्केट कॅप 3262 कोटी रुपये आहे. कंपनीच्या शेअरने गेल्या 3 वर्षात 882 टक्के रिटर्न दिला आहे. सोम डिस्टिलरीज या कंपनीचे शेअर सध्या 329 रुपयांवर असून या शेअरचे मार्केट कॅप 2539 कोटी रुपये आहे.या कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षात जवळपास 1217 टक्के रिटर्न दिला आहे.
जीएम ब्रुअरीज लिमिटेडचा शेअर 594 रुपयांवर असून या शेअरचे मार्केट कॅप 1085 कोटी रुपये आहे. कंपनीच्या शेअरने 3 वर्षात 59 टक्के रिटर्न दिले आहे. त्याचबरोबर असोसिएटेड अल्कोहोलचा शेअर सध्या 467 रुपयांवर व्यवहार करत असून शेअरचे मार्केट कॅप 843 कोटी रुपये आहे. कंपनीच्या शेअरने गेल्या 3 वर्षात जवळपास 108 टक्के रिटर्न दिला आहे. औरंगाबाद डिस्टिलरी लिमिटेडचा शेअर 206 रुपयांवर व्यवहार करत असून शेअरचे मार्केट कॅप 168 कोटी रुपये आहे. कंपनीच्या शेअरने गेल्या 3 वर्षात जवळपास 429 टक्के परतावा दिला आहे.