बिझनेसनामा ऑनलाइन | भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अदानी आणि अंबानी यांची प्रमुख नावे घेतली जातात. मात्र भारतात असे इतरही अनेक उद्योजक आहेत ज्यांच्याकडे कोट्यावधींपेक्षा जास्त पैसा आहे. इतकेच नव्हे तर, या उद्योजकांचा नंबर देखील अदानी आणि अंबानी यांच्या बरोबरीने लागतो. आज आपण अशाच मोठ्या उद्योजक कुटुंबांबाबत जाणून घेणार आहोत जे भारतामध्ये सर्वात जास्त श्रीमंत आहेत.
१) अंबानी कुटुंब
अंबानी कुटुंब हे आपल्या लक्झरी लाईफस्टाईलमुळे सतत चर्चेत असतात. धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज उदयास आणली. तिथून पुढे पुत्र मुकेश अंबानी आणि त्यांच्या तिसऱ्या पिढीने म्हणजेच आकाश अंबानी, ईशा अंबानी, अनंत अंबानी यांनी या इंडस्ट्रीला मोठे केले. आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांचे नाव घेतले जाते. मुंबईत अंबानी कुटुंबाचा कोट्यावधींचा मोठा बंगला आहे. ज्याची संपूर्ण जगभरात चर्चा केली जाते.
२) अदानी कुटुंब
1988 मध्ये गौतम अदानी यांनी आपला व्यवसाय विविध क्षेत्रांमध्ये पसरवण्यास सुरुवात केली. गौतम आदमी यांची दोन्ही मुले त्यांच्या व्यवसायात सक्रियपणे सहभाग नोंदवतात. आज अंबानी कुटुंबानंतर सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अदानी कुटुंबाचे देखील नाव घेतले जाते. आदानी कुटुंब हे आपल्या लाईफस्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रात पसरलेल्या व्यवसायांनी आज गौतम आदानी यांना कोट्यावधींचे मालक बनवले आहे.
३) गोदरेज कुटुंब
रिअल इस्टेट मध्ये गोदरेज कुटुंब सर्वात जास्त नावाजलेले आहे. गोदरेज कुटुंबाचा वारसा 124 वर्षांचा आहे. गोदरेज कुटुंबाचा व्यवसाय निसाबा गोदरेज बघतात. गोदरेज व्यवसायाने गोदरेज कुटुंबाला आज जगभरात प्रसिद्ध केले आहे. गोदरेज कुटुंब देखील भारतामध्ये सर्वात जास्त श्रीमंत असलेल्या कुटुंबांमध्ये ओळखले जाते. गोदरेज कुटुंबाचा पारंपारिक थाट हा नेहमीच चर्चेत असतो.
४) टाटा कुटुंब
टाटा कुटुंबाचा व्यवसाय भारतातच नव्हे तर जगभरात पसरलेला आहे. टाटा समूहाचा पाया जमशेदजी टाटा यांनी घातला. त्यानंतर आज रतन टाटा या समूहाची संपूर्ण जबाबदारी सांभाळतात. रतन टाटा आणि त्यांच्या व्यवसायाबाबत कोणालाही वेगळे काही सांगायची गरज पडत नाही. आज रतन टाटा कोट्यावधी रुपयांचे मालक असले तरी ते आपल्या संपत्तीचा जास्त प्रमाणात सामाजिक क्षेत्रात वापर करतात.
५) मिस्त्री कुटुंब
1865 साली शापूरजी पालोनजी ग्रुपची स्थापना मिस्त्री कुटुंबाने केली. आज मिस्त्री कुटुंब बांधकाम, रिअल इस्टेट, वस्त्रोद्योग, शिपिंग अशा इतर क्षेत्रांमध्ये नावाजलेले आहे. सुरुवातीला मिस्त्री कुटुंबाने अगदी लहान व्यवसायापासून सुरुवात केली होती आज त्यांचा हा व्यवसाय वेगवेगळ्या क्षेत्रात पसरलेला आहे. या व्यवसायात मिळालेल्या यशामुळेच आज मिस्त्री कुटुंब देखील श्रीमंतांच्या यादीत ओळखले जाते.
६) बिर्ला कुटुंब
1857 मध्ये आदित्य बिर्ला समूहाची स्थापना करण्यात आली. सर्वात प्रथम शिवनारायण बिर्ला यांनी कापूस व्यवसायापासून आपल्या बिर्ला व्यवसायाची सुरुवात केली होती. आज बिर्ला कुटुंब, सिमेंट, वित्त, दूरसंचार आणि इतर वैविध्यपूर्ण समूहाचे प्रमुख आहेत. मुख्य म्हणजे आज बिर्ला कुटुंबाला देखील भारतात अदानी अंबानी यांच्या बरोबरीने मान दिला जातो. त्यामुळे बिर्ला कुटुंब देखील भारतामध्ये एक श्रीमंत कुटुंब आहे.