Travel Industry साठी अच्छे दिन!! 2030 पर्यंत आपण बनू चौथे मोठे जागतिक प्रवासी

बिझनेसनामा ऑनलाईन । कोरोना महामारीच्या काळानंतर आपल्या देशातील टुरीझम क्षेत्रात (Travel Industry) वाढ झाली आहे. इथून मिळणारा पैसा दिवसेंदिवस वाढत असल्याने आर्थिक दृष्ट्या हि गोष्ट आपल्या फायद्याची आहे. असं म्हटलं जातंय कि वाढीचा दर जर का असाच कायम राहिला तर वर्ष 2030 पर्यंत आपण जगातील चौथे सर्वात मोठे पर्यटनावर खर्च करणारे म्हणून सिद्ध होऊ शकतो. या क्षेत्रात आपण एकूण 410 बिलियन डॉलर्सचा खर्च करणार आहोत.

कोविड काळाच्या आधी आपल्याकडून पर्यटनावर 150 बिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले होते, आणि आता यात 173 टाक्यांची मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय नागरिक कश्याप्रकारे प्रवास करतात यावर काही पर्यटन संस्थांनी अहवाल सदर केला आहे, त्यात त्या असं म्हणतात कि वर्ष 2030 पर्यंत भ्रमंतीचा आकडा 5 मिलियन पयंत पोहोचलेला असेल जो कि वर्ष 2019 मध्ये 2.3 मिलिअन एवढा होता.

भारतीय कुठे भटकंती करतात? Travel Industry

साधारणपणे आपण असं म्हणू शकतो कि भारतीय नागरिक जपान किंवा अमेरिका या देशांमध्ये भटकंती कारण सोयीस्कर मानतात. त्यांच्यासोबतच वियेत्नाम, नेपाळ, इंडोनेशिया हे देश अनेकांच्या पसंतीचा भाग आहेत. अनेकवेळा एखादी जागा निवडताना आपण तिथे हॉटेल्स आणि रेस्टोरंटस आणि राहायची सोय पाहून निर्णय घेत असतो. देशातील आवडत्या ठिकाणांबद्दल सांगायचं झालं तर सध्या वाराणसी, गुरुग्राम, कोइम्बत्तुर या ठिकाणी पर्यटक अधिक आकर्षित होत आहेत. भारतातील हिल स्टेशन्स हे तर सगळ्यांच्याच आवडीचे ठिकाण आहे. त्यामुळे मनाली, शिमला, लोणावळा या जागा सतत चर्चेत असतात (Travel Industry).

भटकंती करावी असा विचार कुठून येतो?

अनेक भारतीय टीव्ही आणि युटूबच्या माध्यमांमधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे भटकंतीची ठिकाण ठरवतात. किंवा आता भारतात क्रिकेटचे विश्वकप सुरु आहे, त्यामुळे अनेक क्रिकेट प्रेमी या न त्या जाग्यांवर जाऊन खेळाचा आनंद घ्यायला तयार असतात. आता सोशल मिडिया आपल्या मनावर अधिराज्य गाजवते त्यामुळे 85% पर्यटक हे इंस्टाग्राम द्वारे प्रभावित होऊन भटकंतीसाठी बाहेर पडतात.