Travel Insurance : ट्रॅव्हल इन्शुरन्स किती प्रकारचा असतो? कसा मिळतो लाभ? एकदा वाचाच

टाइम्स मराठी । इनशुरन्स हे अनेक प्रकारचे असतात. कठीण काळात मदत व्हावी म्हणून अश्या ठिकाणी आपण पैश्यांची गुंतवणूक करत असतो. हेल्थ इनशुरन्स, लाइफ इनशुरन्स, कार इनशुरन्स अशी नावं तुम्ही नक्कीच ऐकली असतील, किंबहुना त्यात गुंतवणूक सुद्धा नक्कीच केलेली असेल, मात्र कधी ट्रॅव्हल इनशुरन्स (Travel Insurance) बद्दल ऐकलय का? नाही! तर काळजी करू नका, कारण आज जाणून घेऊया ट्रॅव्हल इनशुरन्स नेमका काय असतो व तो का असावा?

ट्रॅव्हल इनशुरन्स म्हणजे काय? (Travel Insurance)

ट्रॅव्हल इनशुरन्स हा विमा क्षेत्रातील सर्वात कमी ओळखला जाणारा इनशुरन्स आहे. याबद्दल आपल्याला कमी माहिती असली तरी देखील हा फारच महत्वाचा इनशुरन्स प्रकार आहे. कोरोनाच्या महामारीनंतर देश विदेशात अनेक सुधारणा झाल्या, त्यामधली एक म्हणजे काही देशांकडून हा ट्रॅव्हल इनशुरन्स अनिवार्य करण्यात आला आहे. पण ट्रेव्हल इनशुरन्स म्हणजे काय? तर हा इन्शुरन्स म्हणजे प्रवास करणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळे आवरण देणे होय.

अमेरिकन डॉलर्सचे चलन जगात अनेक ठिकाणी मान्यताप्राप्त आहे, त्यामुळे बहुतेक कंपन्या ट्रॅव्हल इनशुरन्सच कवरेज डॉलर्समध्ये देतात. तरीही त्याचा हप्ता हा भारतीय पैश्यांत भरता येतो. बहुतेकवेळा ट्रॅव्हल इनशुरन्स हा 50,000 अमेरिकन डॉलर्स ते 10,00,000 अमेरिकन डॉलर्समध्ये विकत घेता येतो. ट्रॅव्हल इनशुरन्सचा (Travel Insurance) हफ्ता हा प्रवासी व्यक्तीचं वय, प्रवासाचे दिवस आणि सम इन्शुअर्ड यांवर अवलंबून असतो.

ट्रॅव्हल इनशुरन्स किती प्रकारचे असतात?

ट्रॅव्हल इनशुरन्स हे विशेषतः चार प्रकारचे असतात. यामध्ये इंटरनेशनल ट्रॅव्हल इनशुरन्स, स्टूडेंट ट्रॅव्हल इनशुरन्स, कोर्पोरेट ट्रॅव्हल इनशुरन्स आणि डोमेस्टिक ट्रॅव्हल इनशुरन्सचा समावेश आहे.

1) इंटरनेशनल ट्रॅव्हल इनशुरन्स (International Travel Insurance)

हा ट्रॅव्हल इनशुरन्स प्रवास करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो, मात्र हा प्रवास भारताबाहेरील असला पाहिजे. ट्रॅव्हल इनशुरन्स हा वैयक्तिक किंवा फॅमिली विझीटसाठी असू शकतो. प्रवासाला सुरुवात केल्यापासून ते परतण्यापर्यंत हा इनशुरन्स ग्राह्य धरला जातो. प्रत्येक प्रवासासाठी नवीन विमा करण्याची गरज असते.

2) स्टूडेंट ट्रॅव्हल इनशुरन्स (Student Travel Insurance)

जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जातात त्यांना हा स्टूडेंट ट्रॅव्हल इनशुरन्स दिला जातो. इथे कोर्सचा पूर्ण कालावधी सामावलेला असतो व आरोग्यासह इतर गोष्टींचा सहभाग त्यात केला जातो. विद्यार्थ्यांचे पालक या ट्रॅव्हल इनशुरन्ससाठी जबाबदार असतात.

3) कोर्पोरेट ट्रॅव्हल इनशुरन्स (Corporate Travel Insurance)

विविध कामांसाठी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना परदेशात पाठवत असतात, अश्यावेळी कर्मचाऱ्यांना कोर्पोरेट ट्रॅव्हल इनशुरन्स दिला जातो. हा विमा कंपनीच्या नवे विकत घेतला जातो, व यात कंपनीला सोयीस्कर अश्या काही कॅव्ह्र्सचा समावेश असतो. कर्मचार्याना अनेक वेळा प्रवास करावा लागल्याने हा विमा मल्टीट्रीप असतो.

4) डोमेस्टिक ट्रॅव्हल इनशुरन्स (Domestic Travel Insurance)

देशातील विविध ठिकाणी प्रवास करताना हा विमा विकत घेतला जातो. यामध्ये हेल्थ इन्शुरन्सवर अधिक भर दिलेला दिसतो. यामध्ये हेल्थ,प्रवास आणि गैरसोयी यांसाठी विविध कव्हर्स दिली जातात.