Twitter Monetization । मायक्रो ब्लॉगिंग म्हणून ओळख असलेला प्लॅटफॉर्म ट्विटरमध्ये एलन मस्क यांनी बरेच बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटर चा लोगो बदलण्यात आला होता. त्यानंतर ट्विटर्स नाव आणि ब्लू टिक पेड करण्यात आली. आता तुम्ही ट्विटर्स उघडल्यास तुम्हाला नाव आणि लोगो मध्ये सुद्धा एक्स दिसेल. म्हणजेच ट्विटर चा लोगो बदलून एक्स आणि ट्विटर चे नाव देखील एक्स ठेवण्यात आले आहे. आता ट्विटर ने या सर्व बदलानंतर काही नवे फीचर्स आणले आहेत ज्या द्वारे यूजर्स पैसे कमवू शकतील. म्हणजेच ट्विटर हे आता पैसे कमावण्याचे साधन होऊ शकते.
ट्विटर आणलेले हे नवीन फिचर अत्यंत खास असून याद्वारे आपण घरी बसल्या पैसे कमवू शकतो. यासाठी काही नियम देखील लागू करण्यात आलेले आहे. फोटोज व्हिडिओ आणि त्याच्या माध्यमातून युजर्स पैसे कमावू शकणार असून कन्टेन्ट क्रिएटर्स साठी हे फीचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे कन्टेन्ट क्रिएटर्स ट्विटरवर फोटोज व्हिडिओज पोस्ट करत असतात. त्यामुळे त्यांचा फायदा होईल. यासाठी 500 फॉलोवर्स आणि अकाऊंट मोनेटायझेशन होणे अत्यंत गरजेचे आहे.
काय आहेत अटी – (Twitter Monetization)
ट्विटर युजर्सचे 500 फॉलोवर झाल्यानंतर युजर्सला या फिचर चा फायदा घेता येणार आहे. ट्विटर च्या माध्यमातून पैसे कमावण्याची सुविधा ही सबस्क्राईब कन्टेन्ट प्रोग्रामच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यानुसार 500 फॉलोवर्स आणि जे युजर्स ब्ल्यू सबस्क्रीप्शन प्लॅन्स स्वीकारतील असे यूजर्स फीचर्सच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी तुम्हाला मोनेटायझेशन करावं लागेल. एवढेच नाही तर यासाठी ट्विटर वर 3 महिन्यांपर्यंत कमीत कमी 15 मिलियन इम्प्रेशन असणे आवश्यक आहे.
तुमच्या ट्विटरवर मोनेटायझेशन करण्यासाठी तुम्ही या पद्धतीने अप्लाय करू शकतात.
- तुमचे ट्विटर अकाउंट ओपन करा. त्यानंतर अकाउंट च्या सेटिंग मध्ये जा.
- सेटिंग मध्ये असलेल्या अकाउंट ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यानंतर मोनेटायझेशन हे ऑप्शन तुम्हाला दिसेल. या ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला सबस्क्रीप्शन आणि ऍड रेवेन्यू शेअरिंग हे दोन ऑप्शन दिसतील. त्यावर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स भरावे लागतील.
- अकाउंट डिटेल्स भरल्यानंतर सबमिट या ऑप्शन वर क्लिक करा.
ट्विटरच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी युजर्सला सबस्क्राईबर्स आणि मोनेटायझेशन सह आवश्यक असलेल्या गोष्टी असल्यास ट्विटर कंटेंट मोनेटायझेशन (Twitter Monetization) प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट केल्यास 50 डॉलर म्हणजे 4000 रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. त्यासाठी twitter वेब वर वापरणाऱ्या यूजर्स ला दर महिन्याला 900 रुपयांचा सबक्रिप्शन प्लॅन घ्यावा लागेल. तर अँड्रॉइड, आयओएस वापरणाऱ्यांसाठी 650 रुपये प्रति महिना सबक्रिप्शन प्लॅन घ्यावा लागेल.