UK Visa Policy : अनेक जणांना बाहेरच्या देशात जाऊन नोकरी करण्याची इच्छा असते. त्यासाठी ते वाटेल ते कष्ट सुद्धा करायला तयार असतात. खास करून अमेरिका, इंग्लंड सारख्या बलाढ्य देशात जात स्वतःचे नशीब अजमावून पाहावे म्हणून लोकं धडपड करतात. तुम्ही देखील जर का ब्रिटन या देशात शिक्षण किंवा नोकरीसाठी जाणायचा विचार करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे. ब्रिटनमध्ये ऋषी सुनक यांनी व्हिसाच्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल केलेले आहेत, आणि याची तुम्हाला जर का काहीही माहिती नसेल तर तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्न कायमचं भंग होऊ शकतं. ब्रिटनमध्ये दररोज येणाऱ्या लोकांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे, काय आहे ब्रिटन सरकारचे नवीन नियम जाणून घेऊया…
काय आहेत ब्रिटन सरकारचे नवीन नियम? (UK Visa Policy)
ब्रिटन सरकारच्या नवीन नियमांप्रमाणे आता ब्रिटनमध्ये जाणाऱ्या परदेशी लोकांना सोबत परिवाराला घेऊन जात येणार नाही .ऋषी सुनक यांनी घेतलेल्या या निर्णयाचा सर्वात मोठा फटका भारतीय नागरिकांना बसू शकतो, कारण आपल्या देशातून परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी अनेक लोकं जाण्याचा विचार करतात. मात्र आता जर का परदेशात तुम्हाला मिळालेला पगार एका ठराविक रकमेपेक्षा अधिक असेल तरच तुम्हाला तिथे राहणायची परवानगी दिली जाईल(UK Visa Policy). स्किलड वर्कर्स व्हिजाची मर्यादा आता वाढवली गेल्यामुळे अनेक जणांचं ब्रिटनमध्ये नोकरी सुरु करण्याचं स्वप्न भंग होणार आहे.
नवीन नियमांप्रमाणे तुमची वार्षिक मिळकत कमीत कमी 38,700 पौंड म्हणजेच 40.61 लाख रुपये असली पाहिजे. आत्तापर्यंत हि मर्यादा 26,000 पौंड म्हणजेच 27.28 लाख रुपये होती. मात्र आता या आकड्यामध्ये वाढ केल्यामुळे अधिक लोकांना हा टप्पा गाठणं कठीण जाणार आहे. जगभरातून अनेक लोकं शिक्षण आणि नोकरीच्या शोधात ब्रिटनची निवड करतात आणि म्हणून ब्रिटनमधला परदेशी लोकांचा आकडा बराच वाढला आहे, तिथल्या सरकारला यावर आळा घालायचा असल्याने त्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय. आणि हा नियम (UK Visa Policy) वर्ष 2024 पासून लागू होण्याची शक्यता आहे.
मात्र यांना मिळाली आहे सूट:
ब्रिटन सरकारने घेतलेला हा निर्णय तिथे काही कामासाठी स्थायिक होऊ पाहणाऱ्या लोकांसाठी असला तरीही यात काही अपवाद आहेत. तुम्ही जर का फेमिली व्हिजाचा (UK Visa Policy) वापर करणार असाल तर जाणून घ्या कि इथेही काही नियम बनविण्यात आले आहेत. आत्तापर्यंत या व्हिजाचा वापर करून तुम्ही ब्रिटनमध्ये जाणार असल्यास तुमचे वार्षिक उत्पन्न 18,600 पौंड म्हणजेच 19.53 लाख असे असणे अनिवार्य होते, मात्र आता हे आकडे बदलून 38,700 पौंड म्हणजेच 40.61 लाख करण्यात आले आहेत. तरीही यामध्ये हेल्थ आणि सोशल केअरच्या क्षेत्रांमध्ये काम करण्याऱ्या लोकांचा समावेश होत नाही, पण यापुढे तुम्ही ब्रिटनमध्ये परिवारासोबत जाऊ शकणार नाही.