Unacademy Success Story : Youtube channel ते 28000 कोटी रुपयांची कमाई; जाणून घ्या ‘या’ प्रसिद्ध कंपनीचा प्रवास

Unacademy Success Story : Unacademy चं नाव ऐकलं आहे ना? नक्कीच असेल कारण या बदलत्या युगात जिथे प्रत्येक गोष्ट इंटरनेटच्या साहाय्याने पूर्ण केली जाते तिथे शिक्षण देखील अपवाद राहिलेला नाही. कोविडच्या काळात आपण बऱ्यापैकी इंटरनेटच्या साहाय्यानेच अभ्यासक्रम पूर्ण केला होता, त्यामुळे screen समोर बसून अभ्यास आपल्यासाठी नवीन नाही. पण, काळ अगोदरचा विचार केला तर तेव्हा मंडळी शाळेत जाऊन अभ्यास करायची किंवा जास्तीत जास्त शेजारच्या ताईकडे जाऊन कठीण वाटत असेलेले विषय सोडवून आणायची. काळ पुढे गेला आणि शिकवण्याचे पैसे घ्यायला सुरुवात झाली, आतातर मोठमोठाले ट्युशन सेन्टर्स तुम्ही पहिलेच असतील, पुढे इंटरनेटची लाट आली आणि शिक्षण सुद्धा ऑनलाईन बिजनेसचा भाग बनला.

Unacademy ची सुरुवात कोणी केली? (Unacademy Success Story)

Unacademy वर केवळ शाळेय विषय नाही तर त्यापुढे जात NEET, JEE सारख्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षांची (Competitive Exams) सुद्धा तयारी करून घेतली जाते. पण, या Unacademy ची सुरुवात कोणी केली माहिती आहे का? नसेल तर आज जाणून घेऊया Unacademyचे सर्वेसर्वा गौरव मुंजाल यांची गोष्ट.

वर्ष 1991 मध्ये गौरव यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. जनाबाई नरसे सहलीतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी NMIMS मधून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. सुरुवातीलाच त्यांना कोडींगमध्ये रुची असल्यामुळे त्यांनी 12वीत असतानाच YouTube Channel सुरु केला होता. गौरव मुंजाल यांना अगोदरपासून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा होतीच म्हणूनच इंजिनीयरिंग झाल्याझाल्या त्यांच्याकडून Flatchat चा पाय रोवला गेला, अगदीच छोटीशी सुरुवात केलेल्या या व्यवसायात आणखीन भर घालून तो वृद्धिंगत करण्यात आला आणि यातूनच Unacademy ची सुरुवात झाली. वर्ष 2015 मध्ये काही मित्रांच्या मदतीने गौरव यांनी Unacademy या शैक्षणिक प्लॅटफॉर्मची सुरुवात केली होती, आणि आज Unacademy ही देशभरातील अनेक educational platforms पैकी एक परिचित कंपनी बनली आहे(Unacademy Success Story).

विचार केला तर आत्ता Unacademy चा विद्यार्थीवर्ग भाला मोठा आहे, देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचून त्यांनी व्यवसाय वृद्धिंगत केलाय. परिश्रम आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर संकटं आली तरीही कधी ना कधीतरी यश मिळतंच. Unacademy ही कंपनी काही अंशी लकी म्हणावी लागेल आणि परिणामी आज मेहनत आणि नशिबाची योग्य सांगड घालून Unacademy चं नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. वेगेवेगळ्या भागांतील शिक्षक आज या प्लॅफॉर्मचा भाग आहेत, आणि आत्ताच्या घडीला Unacademy जवळपास 28000 कोटी रुपयांपर्यंतची कमाई करते.