देशातील बेरोजगारीचा दर कमी झाला; पण ‘या’ कारणामुळे वाढणार सरकारच टेन्शन

बिझनेसनामा ऑनलाईन । भारतासाठी एक आनंदाची आणि खास करून देशातील तरुण वर्गाला दिलासा देणारी बातमी आहे. देशातील बेरोजगारांच्या संख्येत घट झाली असून मी महिन्यात बेरोजगारीचा दर 7.7 टक्क्यांवर घसरला आहे. यापूर्वी हाच दर मागच्या महिन्यात 8.5 टक्के इतका होता. लेबर पार्टिसिपेशन म्हणजेच कामगार सहभागामध्ये 44.19 कोटी इतकी घसरण झाल्याने देशातील बेरोजगारीचा दर कमी झाला आहे. त्यामुळे रोजगाराचा दर घसरला हे ऐकायला जरी बर वाटत असलं तरी लेबर पार्टिसिपेशन कमी सहभागामुळे रोजगाराबाबत लोकांच्या आशा कमी झाल्या आहेत हे अधोरेखित झालं आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या नताशा सोमय्या यांनी त्यांच्या वेबसाइटवर याबाबत माहिती देत म्हंटल की, भारतातील 15 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या लोंकांच्यातील बेरोजगारीचा दर मे 2023 मध्ये 7.7 टक्क्यांवर घसरला आहे, एप्रिल महिन्यात हाच रेट 8.5 टक्के होता. परंतु कामगार सहभागात घट झाल्याने म्हणजेच कामाच्या शोधात श्रमिक बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाल्याने बेरोजगारीचा दर कमी झाला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, खरं तर मे महिन्यात हि घसरण अपेक्षितच होती. कारण एप्रिलमध्ये मोठ्या संख्येने लोक कामगार दलात दाखल झाले होते, त्यावेळी खूपच कमी प्रमाणात लोकांना रोजगार मिळाला. त्यामुळे कामाच्या शोधात लेबर मार्केटमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या मे महिन्यात कमी झाली आहे. याचा परिणाम म्हणजे कामगार शक्ती आकार आकार 45.35 कोटींवरून घसरून 44.19 कोटींवर आला आहे.

दरम्यान, मे 2023 मध्ये शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कामगारांच्या सहभागातील घट जास्त पाहायला मिळत आहे. शहरी भारतातील कामगार संख्येत सुमारे 45 लाखांची घट झाली आहे. तर द्यश्रीकडे मे महिन्यात ग्रामीण कामगार संख्या 30.65 कोटींवरून 29.94 कोटींवर घसरली आहे.