Unemployment Rate In India । हा काळ सणासुदीचा आहे, काही दिवसांपूर्वीच आपण गणेश चतुर्थी अगदी उत्साहात साजरी केली. आणि आता येणाऱ्या दिवाळीच्या स्वागतासाठी तयार आहोत. हा सणांचा काळ खरोखरच सर्वांना आनंद देणारा ठरला कारण मागच्या दोन महिन्यांत आर्थिक देवाण घेवाणीत भरपूर वाढ झालेली पाहायला मिळाली. उत्सवाचा काळ असल्यामुळे लोकांनी गरजेच्या आणि सोबतच काही चैनीच्या वस्तूंची खरेदी केली असावी. देशासाठी अजून एक आनंदाची बाब म्हणजे या काळात आपला बेरोजगारीचा आकडा (Unemployment Rate In India) घसरला आहे. अचानक कश्यामुळे हा बदल झाला हे जाणून घेऊया…
सणासुदीच्या काळात सगळ्यात आनंदाची गोष्ट समोर आली ती म्हणजे बेरोजगारीच्या आकड्यात (Unemployment Rate In India) झालेला मोठा बदल. शहर तसेच देशाच्या विविध गावांमध्ये हा आकडा बऱ्याच प्रमाणात घसरला आहे. शहरातील बेरोजगार लोकांची संख्या ऑगस्ट महिन्यात 10.09 टाके होती, जिच्यात घसरण होऊन सप्टेंबर महिन्यात हाच आकडा 7.09 टक्क्यांवर पोहोचला आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे येणाऱ्या दिवाळीच्या सणाआधी लोकांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी असू शकते. केवळ शहरातच नाही तर देशाच्या गावांमध्ये सुद्धा बेरोजगारी कमी झाली आहे. आपला भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. शेती आणि बागायती हा आपला मुख्य व्यवसाय आहे आणि आजही अनेक गावांमध्ये पोटापाण्यासाठी हाच पिढीजात व्यवसाय केला जातो.
मुबलक पावसामुळे गावांची परिस्थिती सुधारली : Unemployment Rate In India
यावर्षी अनेक ठिकाणी मुबलक प्रमाणात पाऊस पडला. अनेक पिकं अशी आहेत ज्यांची योग्य वाढ होण्यासाठी त्यांना भरपूर पाण्याची गरज असते, यंदाच्या वर्षी हि गरज बऱ्याच प्रमाणात भागली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे काही ठिकाणी शेतकरी खूष आहे, गावात बेरोजगारीचा आकडा सप्टेंबर महिन्यात 6.20 टक्क्यांवर होता
या पावसाळी हंगामात जवजवळ 13% जास्ती पाऊस आपण अनुभवला आहे. महात्मा गांधी नेशनल रुरल इम्प्लोयमेंट( Mahatma Gandhi National Rural Employment Scheme: MGNREGA च्या अंतर्गत शंभर दिवसांसाठी गावातील लोकांना काम दिलं जातं. ) मध्ये होणाऱ्या नोंदणीचा आकडा कमी झाला आहे.याचा अर्थ असा कि गावात लोकांजवळ पैसे कमावण्याच साधन उपलब्ध आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2023 मध्ये या योजनेत नाव नोंदणी कमी झाली आहे. देशाच्या विकासासाठी बेरोजगारी(Unemployment Rate) कमी होणं फारच गरजेचं आहे, आणि हे आकडे बघता येणाऱ्या दिवसांत अजून सकारात्मक बदल होऊ शकण्याची अपेक्षा आहे.