Union Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्प सादर व्हायला आता केवळ एक दिवस बाकी आहेत, नवीन सरकार स्थापन होण्याआधी कार्यरत सरकारची अशी जबाबदरी असते की मध्य काळासाठी देशाचे आर्थिक नियोजन बिघडू न देणे आणि म्हणूनच अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्प सादर करण्याआधीच काल मंत्रालयाकडून एक खास घोषणा करण्याआधी आली जो की पुढे चर्चेचा विषय बनला. मंत्रालयाचा अहवाल सांगतो की येत्या 3 वर्षात आपल्या देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनचा आकडा पार करण्याची शक्यता आहे, काय आहे एकूण बातमी जाणून घेऊया..
काय म्हणतोय अर्थमंत्रालयाचा अहवाल? (Union Budget 2024)
1 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल, मात्र त्याआधीच काल अर्थमंत्रालयाने एक विशेष अहवाल सादर केला. या अहवालात अर्थमंत्रालयाच्या मतानुसार आपली अर्थव्यवस्था वर्ष 2025 पर्यंत 7 टक्क्यांनी वाढून नवीन विक्रम करून दाखवेल आणि एवढच नाही तर लवकरच आपण 5 ट्रिलियनचे ध्येय गाठून जगभरातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. PTIचा अहवाल सांगतो की अर्थव्यवस्थेतील हीच तेजी आपल्या देशाला प्रगती करायला मदत करेल.
त्यापूर्वी दहा वर्ष मागे जाऊन जर का अर्थव्यवस्थेचा आकडा काढून पहिला तर, 1.9 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसोबत आपण जगभरातील 10वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो होतो. मध्ये कोरोना महामारीची लाट आली आणि अनेकांना संकटांचा सामना करावा लागला. एवढी वाईट परिस्थिती असून देखील भारत खचला किंवा डळमळाला नाही. आपल्या अर्थव्यवस्थेचा आकडा वाढत गेला आणि 3.7 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसोबत आपण पाचव्या स्थानावर जाऊन पोहोचलो. ही दहा वर्ष आपल्या प्रगतीची चिन्हे आहेत, आपण केलेल्या परिश्रमाचे फळ आहे, आणि यापुढे देखील अशीच वाटचाल करत राहिलो तर लवकरच जगावर राज्य करू याची शकतो याची खरी आहे.
मोदी सरकार बनवणार का विकसित भारत?
मोदी सरकारचे प्रमुख ध्येय आहे भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवणे, यासाठी आपण Make in India यांसारख्या योजनांची सुरुवात केली आहे, परिणामी भारताला आवश्यक अनेक वस्तू देशात तयार होतात आणि देशाचा पैसे बाहेर जात नाही. देश विदेशातील अनेक तज्ञ हेच सांगतात की भारताची अर्थव्यवस्था अगदी जोमाने वावरत आहे, आणि म्हणून नक्कीच येणाऱ्या काळात ती विशेष टप्पा गाठेल (Union Budget 2024). आपण आर्थिक वर्ष 2025 साठी काही उद्दिष्ये तयार केली आहेत, आणि तिथवर पोहोचण्यात जर का आपण यशस्वी झालो तर 5 ट्रिलियनचा आकडा आपल्यासाठी फारसा कठीण नाही.