Union Budget 2024 Highlight: सादर झाला अंतरिम अर्थसंकल्प; काय म्हणाल्या अर्थमंत्री? कोण आहेत लाभार्थी?

Union Budget 2024 Highlight: आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन संसदेत अर्थसंकल्प प्रस्तुत केला. नवीन संसद भवनात सादर करण्यात आलेला हा पहिला अर्थसंकल्प असल्याने नक्कीच आजचा दिवस इतिहासात कायमस्वरूपी कोरला जाणार आहे. अर्थसंकल्पाच्या भाषणाची सुरुवात करण्याआधी अर्थमंत्र्यांना दही देऊन राष्ट्रपतींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढे 10 वर्षांचा कार्यकाळ वाचून अर्थसंकल्पाच्या मांडणीची सुरुवात करण्यात आली. चला तर मग जाणून घेऊया आजच्या अर्थसंकल्पामध्ये सादर करण्यात आलेले प्रमुखन मुद्दे कोणते..

आजच्या अर्थसंकल्पतील प्रमुख मुद्दे कोणते? (Union Budget 2024 Highlight)

बजेट मांडण्याची सुरुवात करताना अर्थमंत्र्यांनी “सबका साथ सबका विकास” या मंत्राचा आधार घेतला. आत्तापर्यंत सरकारने सगळ्यांना सोबत घेऊन देशाचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, आणि गेल्या 10 वर्षात याच मंत्राच्या आधारे सरकारचे काम सुरु आहे. अंतरिम अर्थसंकल्प असल्याने यावेळी काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या नाहीत, तर अर्थमंत्र्यांनी केवळ राबल्या गेलेल्या योजनांचा नव्याने आढावा घेतला.

महिला सशक्तीकरणांतर्गत देशात सध्या 1 कोटी महिला लखपती झाल्याचे त्यांनी सांगितले, आत्तापर्यंत 3 कोटी महिलांना लखपती दीदीचा लाभ मिळवण्याची संधी मिळाली असं त्या म्हणाल्या. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना, या योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. तसेच 300 यूनिट वीज मोफत देण्याबद्दलही अर्थमंत्री सकारात्मक होत्या. पुढील मुद्द्यात आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात येणायची माहिती पुरवण्यात आली यामधून भारत सरकार देशातील अंगणवाडी आणि आशा सेविकांना 5 लाख रुपयांपर्यंत उपचार सेवेचा लाभ मिळवून देणार आहे.

रेल्वे कोचबद्दल काय म्हणाल्या अर्थमंत्री?

आपल्या देशात सध्या वंदे भारत एक्सप्रेसची जोरदार चर्चा सुरु आहे, याच विकासाला अखिल गतिमान बनवण्यासाठी भारतीय रेल्वेचे 40 हजार नॉर्मल रेल्वे कोच वंदे भारत ट्रेनमध्ये बदलण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. भारतातील प्रवासी वाहतुकीच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी, सरकार हाय ट्रॅफिक कॉरिडॉरच्या बांधणीवर जोर देत आहे. या कॉरिडॉरमुळे प्रवासी ट्रेन्सचे संचालन अधिक गतीने आणि सुरक्षितपणे होईल. तसेच आता हाय-स्पीड ट्रेन्सची संख्या आणखी वाढवली जाईल. देशातील शहरांमध्ये मेट्रोचे जाळे उभारण्यावर भर देण्यात येत आहे, यामुळे शहरांमध्ये प्रवासी वाहतुकीचा ताण कमी होईल.

विमानतळांबद्दल काय म्हणाल्या मंत्री?

देशातील विमान सेवांची स्थिती बदल्याणाचा आता पुरेपूर प्रयन्त केला जाणार असून येत्या 10 वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट करण्यात येईल. आज समोर आलेल्या माहितीप्रमाणे देशात नवीन 149 विमानतळ उभारण्यात येणार आहे. टिअर 2, टिअर 3 शहरांमध्ये उड्डाण योजना राबविण्यावर भर दिला जाणार असून यामध्ये 517 नवीन मार्ग आणि 1.3 कोटी प्रवाशी असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

कृषी क्षेत्राबद्दल अर्थसंकल्प काय सांगतो(Union Budget 2024 Highlight)?

आजच्या बजेटमध्ये कृषी क्षेत्रावर भारत सरकारकडून विशेष लक्ष देण्यात आलं आहे, शेती हा नेहमीच आपला प्रमुख व्यवसाय होता त्यामुळे नवीन अर्थसंकल्पातून देशातील 1361 बाजार समित्या eName शी जोडण्यात येण्याची घोषणा केली आहे, तसेच येत्या पाच वर्षात त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही अर्थमंत्री म्हणाल्या. याशिवाय देशातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसामावेशक कार्यक्रम आखला जाणार आहे आणि जुना आकडा काढून बघायचं झाल्यास PM Kisan Yojanaतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे तर 4 कोटी शेतकऱ्यांना पीकविम्याचे कवच देण्यात आले आहे.

याशिवाय विशेष घोषणा कोणत्या?

अर्थमंत्र्यालाकडून सादर करण्यात आलेली माहिती सांगते की लवकरच देशात मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत टीकाकारणावर भर देण्यात येणार आहे. नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येईल तसेच सरकारकडून गर्भाशयाचा कँसर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या अंतरिम अर्थसंकल्पात कर रचनेसंदर्भात कोणतेही बदल करण्यात आणलेले नाहीत(Union Budget 2024 Highlight). नव्या कर रचनेनुसार आता 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. करपात्र उत्पन्नात 3 टक्क्यांची वाढ झाली आहे, आणि रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती मंत्रालयाने सादर केली आहे.

सगळ्यात शेवटी अर्थमंत्री म्हणाल्या की आता सरकार आदिवासी समाजाच्या विकासावर भर देणार आहे, तसेच इतर पायाभूत सुविधांवर भर देण्यात येईल. गरिबी हटवा मोहिम सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असेल आणि प्रत्येकाच्या घरी पाणी पोहोचावं म्हणून पाणी योजनेवर भर देण्यात येणार आहे. आतापर्यंत भारत मोदी सरकारने 78 लाख फेरीवाल्यांना मदत पोहोचवली असून, 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.