Union Budget 2024: सुखी आणि निरोगी भारत! अंतरिम अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला नवसंजीवनी

Union Budget 2024: जसं की आपण जाणतो या अंतरिम अर्थसंकल्पाकडून अनेक क्षेत्रांना विविध अपेक्षा होत्या, यापैकी हेल्थ सेक्टर देखील एक होता आणि अर्थमंत्रालयाने त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. अंतरिम अर्थसंकल्पातून सरकार हेल्थ सेक्टरला आर्थिक मदत पुरवणार आहे, तसंच देशात नवीन मेडिकल कॉलेज सुरु करण्यात येण्याची घोषणा दरम्यान करण्यात आली आहे.

देशातील हेल्थ सेक्टरमध्ये होणार मोठा बदल : (Union Budget 2024)

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून हेल्थ सेक्टरवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणायची घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक राज्यांतील जिल्हा हॉस्पिटल्सचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच Medical College मध्ये करण्यात येईल. आतापर्यंत सरकारच्या तिजोरीमधून 2.5 टक्के GDP मधला हिस्सा हेल्थ सेक्टरवर खर्च केला जायचा, जो की आपल्या देशाची जनसंख्या पहिली तर नक्कीच पुरेसा नाही.

आता सरकारच्या नवीन निर्णयाप्रमाणे देशातील जिल्हा हॉस्पिटल्सचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केले जाईल, आणि याची जबाबदरी पार पाडण्यासाठी एका खास कमिटीची आखणी करण्यात येईल. यावेळी सरकारला कॅन्सरच्या टिकाकरणावर लक्ष द्यायचे आहे, म्हणूनच देशातील 9-14 वयोगटातील मुलींचे आता मोफत दरांत टीकाकरण केले जाईल.

काय आहे आयुष्मान भारत योजना?

अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता आयुष्मान भारताच्या अंतर्गत देशातील अंगणवाडी सेविका, हेल्पर्स आणि आशा वर्कर्सना कव्हर दिले जाईल(Union Budget 2024). जाणून घ्या की यापूर्वी वरील सर्वांची आयुष्मान भारत योजनेत गणना केली जायची नाही. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील विविध क्षेत्रातील जनसमुदायाला मोफत मेडिकल कव्हर दिले जाते.