Union Budget 2024: बजेटनंतर काय महागणार आणि काय स्वस्त होणार? सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे ‘हे’ आहे उत्तर

Union Budget 2024: आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाबदल तुम्ही अनेक बातम्या वाचल्याच असतील, मात्र एका सामान्य माणसाला बजेटमधून काय जाणून घेण्यासाठी कोणत्या गोष्टींची माहिती हवी असते? एक म्हणजे कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी महाग झाल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया बाजारात होणाऱ्या चढ उतारांबद्दल सविस्तर माहिती

कोणत्या गोष्टी महाग आणि कोणत्या गोष्टी स्वस्त? (Union Budget 2024)

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024 च्या आर्थिक वर्षासाठी अंतरीम अर्थसंकल्प सादर केला. यात काही वस्तूंवरील कर कमी झाल्याने त्या स्वस्त होतील, तर काही गोष्टी महाग होणार आहे. अर्थसंकल्पात, निर्मला सितारामन यांनी इलेक्ट्रिक किचन चिमण्यांवर आणि सोन्याच्या बारांपासून बनवलेल्या वस्तूंवर मूलभूत सीमाशुल्क वाढवल्याची घोषणा केली.

सिगारेट्सवरील करही 16 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याचवेळी, एपिक्लोरोहायड्रिनच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या ग्लिसरीनवरील सीमाशुल्क 7.5 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. संक्षेपाने सांगायचे तर, इलेक्ट्रिक किचन चिमण्या, सोन्याच्या वस्तू आणि सिगारेट्स आता महाग होणार आहेत, तर एपिक्लोरोहायड्रिनच्या उत्पादनासाठी वापरला जाणारे कच्चे ग्लिसरीन स्वस्त होणार आहे.

इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि मशिनरी आता कमी दरात आयात केली जाण्याने या गाड्यांची किंमत कमी होऊन त्या अधिक लोकांना परवडतील असा सरकारचा विश्वास आहे. अर्थमंत्र्यांनी मोबाईल फोन बनवण्यासाठी लागणाऱ्या काही खास गोष्टींच्या आयातीवर लागणारा कर कमी केला आहे. त्याचबरोबर, टीव्हीच्या स्क्रीनमध्ये जे ओपन सेल असतात, त्यांच्या पार्ट्सवर आता फक्त 2.5 टक्के इतकाच कर भरावा लागेल, यामुळे मोबाईल फोन आणि टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांना थोडा दिलासा मिळेल आणि यामुळे कदाचित मोबाईल आणि टीव्ही स्वस्त होऊ शकतील.

वाढत्या तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार होणाऱ्या हिऱ्यांच्या (Lab Grown Diamonds) बीजांवरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे (Union Budget 2024) जेणेकरून त्याची किंमत सोन्या आणि प्लॅटिनमच्या बरोबर राहील. याशिवाय मिश्रित रबरावरील आयात शुल्क दर वाढवण्यात आला आहे.