Union Budget 2024 : 1 तारखेला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पला समजून घ्यायचं असेल तर केवळ समोर असलेल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून चालेल का? तर नाही!! एखादा घटक जर का पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर त्यातील सर्व लहानमोठया बाबींचा अभ्यास करता आला पहिजे, कारण तर आणि तरच तुम्हाला तो विषय समजेल. उद्या देशात सादर होणार अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्या कारकिर्दीतील सहावा अर्थसंकल्प असणार आहे, आणि मोदी सरकारच्या अंतर्गत सादर केला जाणारा शेवटचा अर्थसंकल्प म्हणावा लागेल. यानंतर सत्तांतर होईल, आणि कदाचित कार्यरत सरकार पुन्हा सत्ता स्थापन करेल अथवा नवीन सरकार स्थापन होईल.
अंतरिम बजेट म्हणजे काय? (Union Budget 2024)
अंतरिम बजेट म्हणजे काही काळासाठी वैध असणारं बजेट, निर्मला सीतारामन या उद्या जरी बजेट सादर करणार असल्या तरी ते संपूर्ण आर्थिक वर्षेसाठी वैध ठरणार नाही. येणाऱ्या सरकारवर जुन्या सरकारच्या निर्णयांच्या बोजा होऊ नये म्हणून मतदानाच्या काळात अशी तरतूद करण्यात येते आणि या बजेटला अंतरिम बजेट किंवा Interim Budget असं म्हणतात. बजेट समजून घेताना तुम्हाला काही घटकांबद्दल माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे, हे घटक कोणते आज जाणून घेऊया
१) आर्थिक सर्वेक्षण : आर्थिक सर्वेक्षण म्हणजे Economic Survey. हा बजेटमधला एक प्रमुख घटक आहे, यामध्ये चालू आर्थिक वर्षातील कामगिरी सांगितली जाते आणि येत्या आर्थिक वर्षाच्या आधारे हे सर्वेक्षण ठरवले जाते.
२) महागाई : महागाई म्हणजेच Inflation, सरकारकडून दर महिन्याला महागाईचे आकडे मांडले जातात, आणि या आकड्यांवरून बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेणं सोपं जातं. चलनवाढीचा दर वस्तू, सेवा आणि वस्तूंच्या किमतीतील वाढ आणि घसरणीची माहिती देतो.
३) कर : देशातील प्रत्येक कमावत्या माणसाला सरकारला कर भरावा लागतो, यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर असे दोन प्रकार असतात आणि अर्थसंकल्पात या दोघांविषयी माहिती दिली जाते (Union Budget 2024). प्रत्यक्ष कर हा थेट सरकारच्या खात्यात जमा केला जातो, मात्र अप्रत्यक्ष करात मध्ये येणाऱ्या माध्यमांच्या आधारे कर सरकारपर्यंत पोहोचवला जातो.
४) वित्त बिल : जेव्हा सरकार करून नवीन कर धोरण सुरू केले जाते, तेव्हा ते त्यासाठी वित्त विधेयक वापरतात. त्यात कर धोरणाच्या संरचनेची माहिती दिली जाते.
५) बजेट अंदाज : देशांर्गत येणाऱ्या सर्व विभाग, कार्यालये आणि मंत्रिमंडळांकडून तयार करण्यात येणार अंदाज बजेटची ढोबळ माहिती पुरवतो, यात काही निधी ठरवली जाते ज्याला बजेटचा अंदाज असं म्हटलं जातं. इथे सरकार किती निधी देईल, आणि तो किती काळासाठी वापरला जाईल याबद्दल माहिती मिळते.
६) वित्तीय तूट : गेल्या आर्थिक वर्षात सरकारने किती खर्च केला, त्याचा महसूल किती होता या सर्वचा लेखाजोखा तयार केला जातो, सरकारचा एकूण खर्च आणि एकूण महसूल यातील तफावतीला वित्तीय तूट म्हणतात.