UPI ATM Machine: आता UPI च्या माध्यमातून ATM मधून पैसे काढा; कार्डची झंझट संपली

UPI ATM Machine । जसं की आपल्याला माहिती आहे, Digital India च्या दिशेने आपली वाटचाल सुरु आहे. गरजेच्या सर्व गोष्टींचा वापर तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हावा, व विकसित देश म्हणून आपली ओळख जगभरात व्हावी अशी आपली इच्छा आहे. जागतिक पातळीवर आपण इतरांसाठी उदाहरण तयार करत आहोत. भारताच्या याच ध्येयाला अजून पुढे घेऊन जाणारी नवीन टेकनॉलॉजी आता समोर आली आहे. आता तुम्ही ATM कार्डचा वापर न करताही केवळ UPI वापरून पैसे काढू शकता.

नक्की कसं आहे नवीन ATM?

या नवीन आलेल्या बदलामुळे देवाणघेवाण सोयीस्कर होईल तसेच आपल्या मोबाईल चा वापर करून बँकिंगची कामं करता येतील. नवीन UPI ATM Machine हे BHIM UPI चा सपोर्ट करत आहे. मात्र अजुन Google Pay, PhonePay, Paytm सारख्या लोकप्रिय Transaction Apps चा भाग झालेला नाही. लक्षात घ्या की हे ATM सुद्धा आपल्या दररोजच्या ATM प्रमाणेच काम करेल. दररोजच्या ATM ला लागणाऱ्या नियम व अटी इथे देखील लागू होणार आहेत.

नवीन UPI ATM चा वापर करत कसे पैसे काढावेत? UPI ATM Machine

१) Machine वर येणाऱ्या ‘ UPI Card less Cash’ चा ऑप्शन निवडा.

२) त्यानंतर तुमच्या समोर काही पर्याय दिले जातील. जसे की 100,500,1000,2000,5000 यामधून आपल्या इच्छित रकमेची निवड करावी.

३) रकमेची निवड केल्यानंतर तुमच्या समोर एक QR Code येईल, जो तुम्ही स्कॅन करायचा आहे.

४) यानंतर BHIM UPI वर पैसे काढा या पर्यायाची निवड करावी.

५) आता आपला PIN इथे टाकून पैसे काढावेत, या नंतर तुमच्या मोबाईल वर एक conformation चा संदेश येईल. हा संदेश आल्याचा अर्थ असा की तुम्ही योग्य पद्धतीने पैसे काढलेले आहेत.

हल्लीच वायरल झालेल्या व्हिडिओ मधून या मशीनचा अंदाज घेता येतो. हा व्हिडिओ मुंबईच्या Global FinTech Fest मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. सार्वजनिक वापरासाठी अजून हे मशीन (UPI ATM Machine) पूर्ण झालेलं नाही मात्र स्टेपो मध्ये याचा वापर केला जातो.

वित्त मंत्रालाच्या म्हणण्यानुसार या नवीन मशीनमुळे अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना फायदा होणार आहे. आजकाल सरकार सुद्धा अश्या नवीन माध्यमांना प्राधान्य देत आहे, त्यामुळे येणाऱ्या काही काळातच UPI च्या या मशीनला वाहवा मिळेल असा अंदाज लावला जात आहे.