UPI Auto Reversal : हल्ली डिजिटली चालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. खास करून UPI चा वापर करून होणारे आर्थिक व्यवहार वाढलेले आहेत. यावर्षी UPI द्वारे चालणाऱ्या व्यवहारांमध्ये सुमारे 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. पाहायला गेलं तर हि आनंदाची बाब आहे, आपण डिजिटल इंडिया बनवण्याच्या मार्गावर आहोत, भारतासारख्या बहुसांखिक देशासाठी खरोखरच हा बदल प्रशंसनीय आहे. UPI पेमेंटमध्ये मिळणाऱ्या सुविधांमुळे हा आकडा वाढला आहे. परंतु अनेक वेळा काय होतं, आपल्याकडून चुकून पैसे वेगळ्याच खात्यात जमा केले जातात, मग अश्यावेळी काय करावं पाहूयात…
काय आहे UPI ऑटो रिव्हर्सल (UPI Auto Reversal)
UPI मध्ये मिळणारी सुविधा हि अनेकांना मदत करणारी आहे. अनवधानाने आपल्याकडून चुकीच्या खात्यात पैसे पाठले जाऊ शकतात. आणि अश्यावेळी ते पैसे नेमके परत कसे मिळवावे हा प्रश्न उभा राहतो, अश्यावेळी UPI ऑटो रिव्हर्सलच्या सुविधेचा वापर करता येतो. लक्ष्यात घ्या इथे सगळेच झालेले व्यवहार परत मागे घेता येत नाहीत मात्र काही UPI मार्फत झालेले पेमेंनट्स परत मिळवता येतात, जसं कि जर का तुमच्याकडून केलेला व्यवहार पूर्ण झालेला नसेल (Payment Failure) किंवा तो होण बाकी असेल (Pending Transactions) तर UPI Auto Reversal ऑटो रिव्हर्सलचा वापर करता येतो. अशी एखादी गोष्ट तुमच्या लक्षात आली तर त्वरित तुमच्या बँक किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क करा.
UPI ऑटो रिव्हर्सलचा वापर कसा करावा?
आर्थिक व्यवहार झालेला नाही किंवा व्हायचा बाकी आहे अशी एखादी गोष्ट तुमच्या नजरेत येत असेल तर लगेचच बँक किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरशी (Paytm, GooglePay) संपर्क साधा. या अधिकाऱ्यांना तुमच्या चुकलेल्या व्यवहाराविषयी आवश्यक माहिती द्या. (हा व्यवहार तुम्ही कधी केलात, Transection Reference Number इत्यादी.) व्यवहार पूर्ण न झाल्याची तक्रार वेळेत नोंदवणे गरजेचे आहे, कारण बँकांना अश्या समस्या सोडवण्यासाठी वेळेची मर्यादा दिलेली असते, त्यात जर का तुम्ही तक्रार नोंदवलीत तर वेळेच्या आत तुमची समस्या सोडवली जाईल.
बँक किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरने तुमची तक्रार नोंदवून घेत्यानंतर ऑटो रिव्हर्सलची प्रक्रिया सुरु होते, या प्रक्रियेत थोडासा वेळ जाऊ शकतो त्यामुळे इथे थोडी संयमाने वाट पहावी लागते. एकदाका हि प्रक्रिया पूर्ण झाली कि अधिकाऱ्यांकडून तुम्हाला मेसेज येईल आणि पुढच्या काही वेळातच गमावलेली रक्कम तुमच्या खात्यात परत जमा झालेली असेल.