UPI Launch: भारताचा युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) जगभरात लोकप्रिय होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांनी UPI स्वीकारण्यास उत्सुकता दर्शवली आहे. आज UPI चा विस्तार मॉरिशस आणि श्रीलंकेतही केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता दोन्ही देशांमध्ये UPI सेवा सुरू केली. UPI द्वारे, मॉरिशस आणि श्रीलंकेतील नागरिक देखील आता भारतातील UPI वापरकर्त्यांना पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतील आणि परिणामी यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि पर्यटन वाढवण्यास मदत होईल.
आणखीन दोन देश बनलेत UPIचे वापरकर्ते: (UPI Launch)
12 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी Video Conferencing द्वारे मॉरिशस आणि श्रीलंकेत UPI (Unified Payment Interface) ला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि तिन्ही देशांचे सेंट्रल बँकेचे गव्हर्नर उपस्थित राहिले होते.
मॉरिशस आणि श्रीलंकेत UPI लाँच केल्याने दोन्ही देशांमधील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. या नवीन सुविधेमुळे आता भारतीय पर्यटक UPI द्वारे सहजपणे पेमेंट करू शकतील आणि त्याचप्रमाणे मॉरिशस आणि श्रीलंकेतील नागरिक भारतात UPI द्वारे पेमेंट करू शकणार आहेत.
2016 मध्ये सुरु झाली होती UPI सेवा:
भारतातील युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 2016 मध्ये मोदी सरकारने सुरू केलेली ही सेवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(NPCI) द्वारे चालवली जाते(UPI Launch), यामुळे लोकांना ऑनलाइन पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. UPI मुळे बँक खात्यातून पैसे हस्तांतरित करणे सहज शक्य होते. ही सेवा रिअल-टाइम फंड ट्रान्सफर करण्यास सक्षम आहे आणि IMPS मॉडेलवर आधारित आहे.