UPI Lite Transaction Limit : RBI ची मोठी घोषणा!! आता PIN न टाकता 500 रुपयांपर्यंत करा ट्रांजेक्शन

बिझनेसनामा ऑनलाईन । आज-काल ऑनलाईन पेमेंट (UPI Lite Transaction Limit) करण्याच्या पद्धती वाढल्या आहेत. त्याचाच भाग म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आणि RBI ने यूपीआय लाईट सप्टेंबर 2022 मध्ये लॉन्च केले होते. त्यावेळी कोणताही पिन न टाकता 200 रुपयांपर्यंत पेमेंट करण्याची मुभा देण्यात आली होती, आता मात्र हाच आकडा आरबीआयने वाढवला आहे. त्यानुसार, इथून पुढे तुम्ही पिन न टाकता 500 रुपयांपर्यतचे ट्रँजॅक्शन करू शकणार आहात.

याबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठीच्या उद्देशाने आणि डिजिटल पेमेंट चा अनुभव वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही ट्रांजेक्शन लिमिट (UPI Lite Transaction Limit) ऑफलाइन पद्धतीने दोनशे रुपयांवरून पाचशे रुपये करण्यात आली आहे. यामुळे UPI Lite चा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

UPI Lite म्हणजे काय? (UPI Lite Transaction Limit)

यूपीआय लाईट हे एक ऑनलाईन डिवाइस वॉलेट आहे. या वोलेटच्या माध्यमातून तुम्ही यूपीआय पिन न टाकता पेमेंट करू शकतात. यासाठी एक लिमिट ठरवण्यात आलेली आहे. ही ट्रांजेक्शन लिमिट यापूर्वी 200 रुपये होती ती आता 500 रुपयांपर्यंत गेली आहे. जर तुम्ही देखील यूपीआय लाईटचा वापर करू इच्छित असाल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामधून ॲप वर वॉलेट मध्ये पैसे टाकावे लागतील. यानंतर तुम्ही प्री लोडेड केलेले पैसे यूपीआय लाईटच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी वापरू शकतात. या वॉलेटमध्ये बॅलन्स साठी 2000 रुपये एवढी मर्यादा ठेवण्यात आली आहे.

रेपो रेट जैसे थे-

दरम्यान, काल रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉक्टर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये खास निर्णय घेतले आहेत. या निर्णयामध्ये रेपो रेट संदर्भात देखील माहिती देण्यात आली. रिझर्व बँक इंडियाने आता रेपो रेट मध्ये कोणताही बदल न करता तसाच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळू शकतो. हा रेपो रेट आता 6.50% एवढाच कायम राहणार आहे. या बैठकीवेळी यूपीआय लाईट बद्दल देखील निर्णय घेण्यात आला.