बिझनेसनामा ऑनलाईन । डिजिटल बँकिंग च्या माध्यमातून सर्वजण ऑनलाइन पेमेंट करत असतात. गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि यूपीआय यासारख्या ऑनलाइन पेमेंट ॲप वरून कधीही केव्हाही ऑनलाइन पेमेंट करता येते. या ॲपवरून आपण सुरक्षितपणे पेमेंट करू शकतो. परंतु बऱ्याच वेळेस आपल्याकडून सर्वसाधारण चुका होऊन जातात. आणि यामुळे आपल्याला मोठा आर्थिक फटकाही बनू शकतो. या चुका नेमक्या कोणकोणत्या आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी काय करावं लागेल हे आज आपण जाणून घेऊया….
१) UPI कोड पुन्हा पुन्हा चेक करणे
आपण कोणताही विचार न करता ऑनलाइन पेमेंट करून देतो. पण बऱ्याचदा चुकीचा UPI कोड देखील आपल्याकडे आलेला असतो. त्यामुळे आपल्याला लक्ष देऊन आणि विचार करूनच पेमेंट करणे योग्य आहे.
२) नंबर परत चेक करणे
पेमेंट करत असताना ज्या नंबर वर आपण पैसे पाठवणार आहोत तो नंबर पुन्हा पुन्हा चेक करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा एखादा नंबर इकडे तिकडे होऊन चुकीच्या नंबर वर पेमेंट केले जाते जाते. आणि चुकीच्या नंबरवर गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी नंतर बरीच प्रोसेस करावी लागते.
३) पेमेंट आकडे चेक करणे
यूपीआय पेमेंट करताना तुम्हाला संपूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा पेमेंट करताना आपल्याकडून चुकून जास्तीचे पेमेंट केले जाते. यापासून वाचण्यासाठी तुम्ही पेमेंट करताना टाकलेले आकडे म्हणजेच नेमकी किती रक्कम पाठवायची आहे हे पुन्हा एकदा तपासून पाहणे गरजेचे आहे.
४) सायबर फ्रॉड पासून वाचा-
सध्या ऑनलाईन डिजिटल बँकिंगचं जग असल्यामुळे सायबर क्राईम किंवा ऑनलाइन चोरीचे प्रकार प्रचंड वाढले आहे. ऑनलाइन पद्धतीने शॉपिंग करणे, मोबाईल नंबर वरून कॉल आल्यास त्यांना अकाउंट नंबर सांगणे, धमकीचे फोन येणे, या गोष्टीमुळे एका ओटीपी वर, तुमचे बँक अकाउंट खाली होऊ शकते. त्यामुळे UPI स्कॅम पासून वाचणे अत्यंत गरजेचे आहे. ऑनलाइन पेमेंट ॲप घेताना थर्ड पार्टी ॲप्स न घेता यूपीआय ॲप डाऊनलोड करा जेणेकरून तुमचे पैसे आणि बँक अकाउंट सेफ राहील.
५) अँप सेक्युर करा –
UPI बरेच असे सर्टिफिकेट ऑप्शन आपल्याला देत असतो. ज्यातून आपण UPI पिन, फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन या ऑप्शन नुसार सुरक्षितपणे पेमेंट करू शकता.
६) ट्रांजेक्शन हिस्ट्री चेक करणे –
UPI पेमेंट केल्यावर किंवा एखाद्या वेळी ट्रांजेक्शन हिस्टरी चेक करणं गरजेचं आहे ज्यामुळे आपण कोणाला पेमेंट केलेलं आहे किंवा आपल्या अकाउंट वरून कोणी पेमेंट केलेलं असेल तर ते आपल्याला लगेच कळू शकेल